आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लागिरं झालं जी\'च्या सेटवर सेलिब्रेट झाला \'विक्या\'चा बर्थडे, बघा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील 'लागिर झालं जी' या मालिकेत विक्रम उर्फ विक्याची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल चव्हाणचा 29 मे रोजी वाढदिवस झाला. यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर निखिलच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन झाले. निखिलने वाढदिवसानिमित्त सेटवरच केक कापला. यावेळी मालिकेतील सर्व कलाकारांनी निखिलसोबत धमाल मस्ती केली.

 

सध्या मालिकेत अजिंक्य आणि शीतल यांच्या लग्नाचा सिक्वेन्स शूट होत आहेत. त्यामुळे निखिलच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये मालिकेतील पुरुष मंडळी डोक्यावर फेटा आणि कुर्ता-पायजामात दिसली. तर महिला कलाकारदेखील नटलेल्या दिसल्या. अजिंक्य म्हणजेच अभिनेता नितेश चव्हाण नवरदेवाच्या रुपात तर शीतल म्हणजेच अभिनेत्री शिवानी बोरकर नववधूच्या रुपात दिसली.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा, निखिल चव्हाणच्या बर्थडे सेलिब्रेशनचे खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...