आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOOD NEWS: हा अॅक्टर लवकरच होणार बाबा, दीड वर्षांपूर्वी अॅक्ट्रेससोबत थाटले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 'दुनियादारी‘ या सुपरहिट मराठी सिनेमातील 'सॉरी' तुम्हाला आठवतोय ना.. बरोबर आम्ही बोलतोय ते मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता प्रणव रावराणेविषयी...  प्रणवच्या घरी लवकरच चिमुकल्याचे आगमन होणार आहे. त्याची पत्नी अमृता हिच्याकडे गोड बातमी आहे. अलीकडेच प्रणव आणि अमृता यांनी मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. प्रणवने     फोटोशूटमधील काही निवडक फोटोज आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर करुन चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. प्रणवने फोटो शेअर करुन लिहिले, "सांगण्यास आनंद होत आहे की... लवकर आमच्याकडे बाल कलाकार येणार आहे..."

 

दीड वर्षांपूर्वी झाले लग्न..

डिसेंबर 2016 मध्ये प्रणवने अमृता सकपाळसोबत लग्नगाठ बांधली. हे या दाम्पत्याचे पहिले अपत्य आहे. 

 

मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता प्रणव...

मराठी सिनेमांसोबतच प्रणव रावराणे हे मराठी रंगभूमीवरील नावाजलेले नाव आहे. एक सात नमस्ते, आपण यांना पाहिलंत का?, लगे रहो राजाभाई, एक दोन तीन चार, तीन जीव सदाशिव, वा-यावरची वरात, वासूची सासू यांसह अनेक नाटकांमध्ये प्रणवने काम केले आहे. लवकरच प्रणवचा 'मस्का' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

कोण आहे प्रणवची जोडीदार...
प्रणवच्या पत्नीचे नाव आहे अमृता सकपाळ. प्रणवप्रमाणेच अमृतासुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अमृता छोट्या पडद्यावरील नावाजलेले नाव आहे. ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतील ‘स्वामिनी’ ही अमृताने साकारलेली व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली आहे. ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात शिकत असताना अमृताने आंतरमहाविद्यालयीन एकांकिकेद्वारे अभिनयाची वाट चोखाळली. ‘एक कलावंत जगताना’ ही एकांकिका खूप गाजली होती. कॉलेज संपल्यानंतर कॉलेजच्याच एका हौशी नाटक मंडळी ग्रुपबरोबर अमृताने खुल्या गटातील नाट्यस्पर्धांमध्ये नृत्य, नाटक, एकांकिका या माध्यमातून काम केले आहे. त्यानंतर मोहन वाघ यांच्या बॅनरने नव्याने ‘ऑल दी बेस्ट’ची आखणी केली होती. त्यातील प्रमुख भूमिकेसाठी अमृताची निवड झाली आणि तिने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. ‘लक्ष्मणरेषा’, ‘लज्जा’, ‘अवघाचि संसार’ यांसारख्या मालिकांबरोबरच अमृताने ‘हरी माझ्या घरी’ हा एक सिनेमाही केला. ‘ऑल दी बेस्ट’, ‘ऑल दी बेस्ट म्युझिकल’, ‘भारत भाग्यविधाता’ ही अमृताची गाजलेली नाटकं आहेत.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, प्रणव आणि अमृताने केलेल्या मॅटर्निटी फोटोशूटची खास झलक....

बातम्या आणखी आहेत...