आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'या\' कृत्यामुळे Social Media वर उठली रितेश देशमुखवर टीकेची झोड, चौफेर टीकेनंतर माफीनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे दोन फोटो रितेश देशमुखने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर रितेशने हे दोन्ही फोटो ट्वीटर अकाउंटवरुन डिलीट करुन माफीनामा सादर केला. - Divya Marathi
हे दोन फोटो रितेश देशमुखने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर रितेशने हे दोन्ही फोटो ट्वीटर अकाउंटवरुन डिलीट करुन माफीनामा सादर केला.

अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव, पानिपतकार लेखक विश्वास पाटील आणि त्यांचे सहकारी 5 जुलै रोजी रायगडावर गेले होते. तिथे त्यांनी राजदरबारातील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी मेघडंबरीत चढून फोटो काढले होते. ते फोटो रितेशने सोशल मीडियावर शेअर केले. मात्र मेघडंबरीवर चढून फोटो काढल्याने रितेश देशमुखवर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर नेटकरांनी रितेश आणि त्याच्या सहका-यांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यानंतर रितेशने सोशल मीडियावरील फोटो डिलीट करुन माफीनामा सादर केला.

 

चौफेर टीकेनंतर कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता केवळ भक्तीभावनेतून फोटो काढले, पण यामुळे जर कोणीही दुखावले असेल तर त्यांची मी अंतःकरणापासून माफी मागतो, असे रितेशने ट्वीट करुन म्हटले आहे. 


रितेशचे ट्वीट जसेच्या तसे... 
आपल्या सर्वांचे दैवत असणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मी ही इथल्या वातावरणाने भारावून गेलो होतोे.


त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केलं. आजन्म ज्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायापाशी कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. 

 

तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंतःकरणपूर्वक माफी मागतो. 


पुढील स्लाईड्सवर बघा, रितेश देशमुखचे ट्वीट आणि त्याने शेअर केलेले रायगडावरील आणखी काही फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...