आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सरस्वती'च्या खलनायकनंतर शेखर फडके आता 'तू माझा सांगाती'मध्ये चरित्र भूमिकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक कलाकार हा आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. आपली मालिकेत किंवा सिनेमात असणारी व्यक्तिरेखा चांगली साकारली जावी यासाठी तो ती भूमिका समरसून जगत असतो. आपली प्रत्येक भूमिका अगदी प्रामाणिकपणे साकारणारे शेखर फडके आपल्याला एका नव्या भूमिकेतून आपल्या भेटीला आले आहेत. "तू माझा सांगाती" या मालिकेत शेखर विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणजेच ज्ञानेश्वरांच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. नेहमीपेक्षा वेगळा लूक तसेच चरित्र भूमिका या मालिकेत ते साकारत आहेत. 

 

अनेक मराठी नाटकांमध्ये, मालिकांमध्ये तसेच सिनेमांमध्ये शेखर फडके यांच्या अभिनयाचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळाले आहेत. या मालिकेतही त्यांच्या अभिनयातील वैविध्यता आपल्याला पाहायला मिळते आहे. आतापर्यंत त्यांनी विनोदी भूमिका तसेच 'सरस्वती' मालिकेतील "भिकूमामा" हा विनोदी खलनायक साकारला आहे, या मालिकेत त्यांच्या अभिनायाचं गंभीर रूप पाहायला मिळत आहे. 


"विठ्ठल" हे पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकऱ्याच्या मुखी असलेलं नावं. या नावाची महिमाची अशी आहे की नाव उच्चारताच अंगी उत्साह जाणवतो. या विठ्ठलाचे अनेक भक्त होते, ज्यांना आपण संत म्हणून ओळखतो. अशा या संतांची परंपरा सांगणारी "तू माझा सांगाती" या मालिकेत पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत संत ज्ञानेश्वर यांची महती सांगण्यात येत आहे. शेखर फडके यांनी आपल्या विनोदी शैलीतल्या भूमिकांनी प्रेक्षकांना हसवलं आहे, त्यांनी साकारलेली विठ्ठलपंतांची भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल यात शंका नाही.  

बातम्या आणखी आहेत...