आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडीत बसलेल्या माणसाने केले अश्लील चाळे; अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्याकडून पोलिसांत तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी त्यांच्यासमोर अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सूत्रांनुसार, पांढऱ्या बीएमडब्ल्यु गाडीत बसलेला व्यक्ती चिन्मयी यांच्यासमोर अश्लील चाळे करत होता. चिन्मयी यांना या प्रकाराचा प्रचंड संताप आला. त्या व्यक्तीला पकडण्यासाठी त्या धावल्याही, पण तो पळून गेला, अशी माहीतीही समोर आली आहे.

 

विलेपार्ल्यातील पार्ले टीळक शाळेजवळ आज (सोमवार) हा प्रकार घडला आहे. याविरुद्ध चिन्मयी सुमीत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. 'या बीएमडब्ल्यु गाडीचा शेवटचा नंबर 1985 आहे आणि या गाडीला ताबडतोब ट्रेस करा', असे चिन्मयी यांचे पती आणि अभिनेता सुमीत राघवन यांनी पोलिसांना सांगितले आहे. 

 

या बातमीनंतर सुमीत राघवन यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टवर सेलिब्रेटीच्या कमेंट यायला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री  मनवा नाईकने त्या माणसाला पकडल्यानंतर त्याला जीवे मारले पाहिजे असे म्हटले आहे तर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी  ही फारच घृणास्पद घटना आहे अशी कमेंट दिली आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा,  सुमीत राघवन यांनी शेअर केलेली पोस्ट आणि त्यावर सेलिब्रेटींच्या कमेट्स...

बातम्या आणखी आहेत...