आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ती सध्या काय करते' मधील 'ही' अभिनेत्री आठवतेय, आज साजरा करतेय लग्नाचा पहिला वाढदिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'ती सध्या काय करते' या चित्रपटातील अभिनेत्री ईशा फडके आज तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपटात एका छोट्याश्या भूमिकेनेही ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली होती. तिने अभिनेता अभिनय बेर्डेच्या प्रेयसीची भूमिका केली होती. दोघांवर चित्रीत झालेले 'जरा जरा…' हे गाणेही हिट ठरले होते.

 

ईशा फडकेचा हा विवाह सोहळा 28 फेब्रुवारी रोजी पुण्यात पार पडला. ईशा ही एक प्रोफेशनल डान्सर आहे. तिचे संपूर्ण शिक्षण पुण्यात झालं आहे. पुण्यात वाकड परिसरातील इंदिरा कॉलेजमध्ये तिचे शिक्षण झालं आहे. गेल्या 12 वर्षांपासून ती संभवी वझे–दांडेकर यांच्याकडे कथ्थकचे शिक्षण घेत आहे. तिने नुकतीच विशारद ही पदवी मिळवली आहे. गंधर्व महाविद्यालयातून तीने पदवी घेतली आहे. कथ्थक सोबतच ईशाने सालसाचे देखील प्रशिक्षण घेतले आहे. हे प्रशिक्षण तिने रॉकी पूनावाला यांच्याकडून घेतले आहे. त्याचप्रमाणे ईशाचा आपल्या लोकनृत्यात देखील हातखंडा आहे. तिने गरबा, दांडिया, लावणी, भांगडा यामध्ये देखील तरबेज आहे. 

 

ईशाच्या पतीचे नाव अंबर गोखले आहे. अंबर हा प्रोफेशनल तबलावादक आहे. 

 

पुढे बघा, ईशाच्या लग्नाचे तसेच तिच्या पतीसोबतचे तिचे काही खास फोटोज...

बातम्या आणखी आहेत...