आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NewPics:निळ्या रंगाच्या पैठणीत खुलली माधुरी दीक्षित, कार्यक्रमात सीमा देव यांच्या पडली पाया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शुक्रवारी रात्री झी गौरव पुरस्कार दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाची यावेळेसची खासियत होती ती म्हणजे 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित. माधुरीच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला चार चाँद लावले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यावेळी माधुरीने घातलेली निळ्या रंगाची पैठणी, गजऱ्यात तिचा मराठमोळा श्रृंगार फारच खुलून दिसत होता. या कार्यक्रमात आलेल्या मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या पाया पडताना माधुरी दिसली. यासोबतच वंदना गु्प्ते, रेशम टीपणीस, सुरेश वाडकर, अभिजीत खांडकेकर, जॅकी श्रॉफ यांसारख्या कलाकारांसोबत माधुरीने कार्यक्रम छान एन्जॉय केला. 

 

माधुरी लवकरच 'बकेटलिस्ट' या चित्रपटातून आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे तसेच तिची मराठीतील पहिलीच निर्मिती असलेला '15 ऑगस्ट' या सिनेमाचेही शूटिंग सुरु झाले आहे. या कार्यक्रमादरम्यानचे माधुरीचे काही Candid आणि इतर कलाकारांसोबतचे नवीन फोटो आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा काही खास फोटोज्...  

बातम्या आणखी आहेत...