आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - गतकाळातील अभिनेत्री अतिशय सुंदर होत्या यात शंकाच नाही पण आताच्या काळातील बोल्डनेस तेव्हा फार कमी पाहायला मिळत असे. आज 40 आणि 50 च्या दशकातील एक बोल्ड अभिनेत्री म्हणजेच नलिनी जयवंत यांची बर्थ अॅनिवर्सरी आहे. 18 फेब्रुवारी 1926 रोजी मुंबईत जन्मलेल्या नलिनी यांचे प्रोफेशनल आयुष्य फार ग्लॅमरस होते पण जीवनाच्या अखेरच्या काळात त्या एकाकी पडल्या आणि सुमारे 3 दिवस त्यांचा मृतदेह घरात पडून होता. चेंबुरमध्ये होते घर..
नलिनी जयवंत 40 आणि 50 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. नात्याने नलिनी या काजोलची आजी शोभना समर्थ यांच्या चुलतबहीण होत्या. त्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा त्यांचा मृतदेह 3 दिवस घरात पडून होता. त्या मुंबईतील चेंबूर भागातील येथील यूनियन पार्क येथील घरात राहत होत्या. संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता तरी कोणतीही एफआयआर त्याविरुद्ध लिहीली गेली नव्हती.
- नलिनी जयवंत यांचा 2010 साली त्यांच्या राहत्या घरात संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता.
- विशेष गोष्ट अशी आहे की, त्यांचा एक दूरचा नातेवाईक अॅम्ब्युलन्समध्ये त्यांचा मृतदेह घेऊन गेला पण कोणीही नलिनी यांच्या मृत्यूबद्दल एफआयआर दिली नाही. चेंबूर पोलीस स्टेशनचे इन्सपेक्टर राठोड यांनी याविषयी माहिती दिली होती.
- नलिनी यांच्या शेजारच्यांनी सांगितले की, नलिनी यांचा एक दूरचा नातेवाईक आला आणि त्यांचा मृतदेह अॅम्ब्युलन्समध्ये टाकून घेऊन गेला. त्याबद्दल नंतर कोणालाच काही माहिती मिळाली नाही.
1983 पासून एकट्याच राहत होत्या नलिनी..
- नलिनी यांनी 40 च्या दशकात दिग्दर्शक विरेंद्र देसाईबरोबर विवाह केला होता. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न अभिनेता प्रभु द्यालसोबत केले ज्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटात काम केले होते.
- 1983 पासून नलिनी यूनियन पार्क स्थित घरात एकांत जीवन जगत होत्या. मृत्यूसमयी त्या 84 वर्षाच्या होत्या.
पुढच्या स्लाईडवर वाचा, नलिनी यांच्याबद्दल काही खास गोष्टी आणि पाहा, 1951 मध्ये केले गेलेल्या त्यांच्या फोटोशूटची झलक..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.