आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी टेलिव्हीजन इतिहासातील सर्वात Coolखलनायिका आहे शनाया, ब्रेकअपमुळे आहे सध्या चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री रसिका सुनील अर्थात सर्वांची लाडकी शनाया सध्या तिचा तथाकथित बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपने चर्चेत आहे. मालिकेत रसिकाने खलनायिका जरी साकारली असली तरी ती प्रेक्षकांची तितकीच लाडकी आहे याचे कारण आहे की शनाया लोकांना खलनायिका नव्हे तर एक वाट चुकलेली मुलगी वाटते. कोणत्याही कार्यक्रमाला या मालिकेची टीम गेल्यावर तिथे रसिकावर टीकेऐवजी तिच्यावर कौतुक आणि प्रेमाचा वर्षाव झालेला पाहायला मिळतो. कॉलेजमधील युथ फेस्टीव्हलमधून सुरु झाला अभिनयाचा प्रवास...

 

रसिका सुनील जेव्हा कॉलेजच्या पहिल्या वर्षात हबोती तेव्हा तिने कॉलेज युथ फेस्टीव्हलदरम्यान एक अॅक्टींग वर्कशॉप केले होते. यानंतर तिने केलेल्या एकांकीकेदरम्यान एका सेक्रेटरीची बातमी केली होती. यानंतर रसिकाने राज्यनाट्य पुरस्कारात लव्ह आज कल या एकांकीकेत लीड रोल केला होता. विशेष म्हणजे यासाठी तिला पुरस्कारही मिळाला होता.

 

राज्यनाट्य केल्यानंतर लागली अभिनयाची चटक..
रसिकाने सांगितल्याप्रमाणे राज्यनाट्यानंतर तिच्यामध्ये अभिनयाबद्दलची रुची उत्पन्न झाली आणि तिने अभिनयक्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. रसिकाने माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका, बसस्टॉप हा चित्रपट आणि पोश्टरबॉईज या चित्रपटात लावणीही सादर केली आहे.

 

लावणीसाठी केला 9-10 तास रिहर्सल..
पोश्टर बॉईज या चित्रपटात रसिकाने प्रथमच लावणी सादर केली. या लावणीचे नृत्य दिग्दर्शन खुलवा खामकर करणार हे एकून ती तणावात आली आणि यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार हे तिला कळून चुकले. पहिल्या दिवशी फुलवाने फटकारल्यानंतर तिने रात्री घरी जाऊन 9-10 तास रिहर्सल केला होता आणि अखेर तिला तिच्या मेहनतीची पोचपावती फुलवानेच कौतुक करुन दिली. 

 

सिद्धार्थ चांदेकरसोबत ब्रेकअपच्या चर्चा..
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत रसिका सुनील रिलेशनशीपमध्ये असल्याच्या खूप चर्चा होत्या. दोघेही एकमेकांसोबत इन्सटाग्रामवर भरपूर फोटो शेअर करत असत. काही दिवसांच्या चर्चेनंतर सिद्धार्थ आणि रसिकाचे ब्रेकअप झाले असल्याचे समोर आले आणि सिद्धार्थ अभिनेत्री मिताली मयेकरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे कळाले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रसिका सुनीलचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...