आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शकासोबत विवाहबंधनात अडकली \'दिल दोस्ती..\'ची \'मँगो बर्फी\', 10 वर्षे होती रिलेशनशीपमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील अभिनेत्री मँगो बर्फी अर्थात रसिका वेंगुर्लेकर विवाहबंधनात अडकली आहे. रसिकाने फ्रेशर्स मालिकेचा दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदेसोबत संसार थाटला आहे. अनिरुद्ध आणि रसिका यांचा हा प्रेमविवाह आहे. हे दोघे एकमेकांना गेल्या 10 वर्षापासून ओळखतात. मागीलवर्षी 3 मे 2017 रोजी दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यांच्या साखरपुड्याला 'फ्रेशर्स' मालिकेतील कलाकार मिताली मयेकर, रश्मी अनपट, अमृता देशमुख, ओंकार राऊत, सिद्धार्थ खिरीद, अमित खेडेकर  उपस्थित होते.

 

अनिरुद्धने 'फ्रेशर्स' मालिकेसोबतच 'का रे दुरावा'चेही दिग्दर्शन केले आहे. तर रसिकाने अनिरुद्ध शिंदेच्या 'फ्रेशर्स' मालिकेतील रेणुका भिल्लारेची तसेच 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत प्रग्याची भूमिका केली आहे. रसिका सध्या तु माझा सांगाती या मालिकेत राधीची भूमिका करत आहे. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रसिका-अनिरुद्धच्या लग्नाचे तसेच साखरपुड्याचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...