आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणच्या \'आपला मानूस\'चा First Look आला समोर, नानाला म्हटले \'सैतान\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अजय देवगणने त्याचा आगामी मराठी प्रोजेक्ट 'आपला मानूस'चा लुक ट्वीट केला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर नानाचा पावसात बाईक चालवतानाचा फोटो आहे. या फोटोवर हा 'सैतान बाटलीत मावणार नाही' असे कॅप्शन दिले आहे. चित्रपट येत्या 9 फेब्रुवारी रोजी रीलीज होणार आहे. चित्रपटाच्या या फर्स्ट लुकनंतर प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी उत्सुक्ता दुणावली आहे.

 

अजय देवगणने त्याच्या या प्रोजेक्टबद्दल आणि मराठीवरील प्रेम व्यक्त करताना सांगितले की, "मराठीशी नाते तसे लहानपणापासूनच होते पण काजोलशी लग्न केल्यानंतर या भाषेच्या आणि संस्कृतीच्या प्रेमात पडलो. या सुंदर मराठी संस्कृतीमुळेच मराठी सिनेमाची खास ओळख आहे आणि या खास ओळखीशी जूळण्यासाठी मीसुद्धा माझा नवीन मराठी चित्रपट घेऊन आलो आहे."

अजय देवगणच्या या चित्रपटात अभिनेता नाना पाटेकर, सुमीत राघवन आणि इरावती हर्षे या मराठी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या मुहुर्त क्लॅपवेळी अजयची पत्नी आणि अभिनेत्री काजोल उपस्थित होती.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या चित्रपटाच्या मुहुर्त क्लॅपवेळचे काही Photos..

बातम्या आणखी आहेत...