आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवंगत शाहीर साबळे यांचे या प्रसिद्ध हिंदी अभिनेत्याशी होते जवळचे नाते, ही आहे त्यांची फॅमिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठीतील एक दमदार आवाज म्हणून शाहिर साबळे यांचे नाव अग्रस्थानी आहे. नुकताच 20 मार्च रोजी त्यांची तिसरी पुण्यतिथी आहे. 3 सप्टेंबर 1923 रोजी साताऱ्यातील पसराणी येथे जन्मलेल्या शाहीर यांचे पूर्ण नाव शाहीर कृष्णराव साबळे असे होते. केवळ गायकच नाही तर ते लेखक, नाट्यलेखक, थिएटर आर्टीस्ट आणि कलाकार होते. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कुटुंबाविषयी खास माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
 हिंदी अभिनेता अजित वच्छानी आहेत जावई..
 शाहीर साबळे यांच्या कन्येचे नाव चारुशीला साबळे असे आहे. चारुशीला यांनी मराठी चित्रपटांत काम केले आहे आणि अजित वच्छानी यांच्यासोबत लग्न केले आहे. अजित वच्छानी यांचा 2003 सालीच हृद्यविकाराने मृत्यू झाला आहे आणि त्यांची मुलगी त्रिशाला वच्छानी ही एअरहोस्टेस आहे. 
 
केदार शिंदे आहे नातू..
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आहेत. तर त्यांचा मुलगा देवदत्त साबळे हे प्रसिद्ध संगीतकार आहेत. तर त्यांचा नातू शिवदत्त साबळे प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आहेत त्यांनी 'अजब लग्नाची गजब गोष्ट',' कॅनवास' आणि 'रंग मनाचे' यांसारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शाहीर साबळे यांची दुसरी मुलगी वसुंधरा दत्त यांचा मुलगा ओंकार दत्त हा साबळे यांचा नातू आहे आणि तो सुद्धा मराठी चित्रपटक्षेत्रात दिग्दर्शक आणि लेखक म्हणून काम करतो. 
 
 छोट्याशा गावात झाला जन्म..
 शाहीर साबळे यांचा 1923 साली साताऱ्यातील परसाणी येथे एका लहानशा गावात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतीराव साबळे होते. लहानपणापासूनच त्यांना बासरी वाजवण्याचा फार शौक होता. लहानपणी गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर अमळनेर येथे मामाकडे ते शिक्षणासाठी गेले यादरम्यान त्यांना साने गुरुजीचा सहवास लाभला आणि त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला. यादरम्यानच त्यांना लिखाणाचा शौक लागला. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, शाहीर साबळे यांच्या कुटुंबियांचे काही खास Photos...
बातम्या आणखी आहेत...