आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश मांजरेकरांच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोहोचला 'परशा', दिसला वेगळ्याच लूकमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांचा मुलगा आणि अभिनेता सत्या मांजरेकरचा 19 मार्च रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने महेश मांजरेकरांनी त्यांच्या घरी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी उपस्थिती लावून सत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


पार्टीत पोहोचला 'परशा'... 
या पार्टीत 'सैराट' या चित्रपटातील परशा अर्थातच अभिनेता आकाश ठोसरनेही आवर्जुन हजेरी लावली होती. आकाश आणि सत्या हे दोघे चांगले मित्र आहेत. अलीकडच्या काळात आलेल्या एफयू या चित्रपटात हे दोघे एकत्र झळकले होते. यावेळी आकाशला ओळखणे क्षणभर कठीण झाले. त्याला लूक पूर्णपणे बदलेला दिसला. आकाशचे केस आणि दाढी वाढलेली दिसली. सैराट आणि एफयूनंतर आकाशच्या नवीन चित्रपटाची त्याचे चाहते नक्कीच वाट बघत आहेत. आकाशचा हा नवीन लूक बघता त्याने आगामी चित्रपटासाठीच केस आणि दाढी वाढवली असावी, असा अंदाज वर्तवला जातोय. 


जिममध्ये आकाशने साजरा केला सत्याचा वाढदिवस...
आकाश आणि सत्या हे दोघेही एकाच जीममध्ये वर्कआऊट करतात. रात्री झालेल्या बर्थडे पार्टीपूर्वी आकाश ठोसर आणि त्याच्या काही मित्रांनी जिममध्ये सत्याचा वाढदिवस साजरा केला. या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.


अभिनेता आहे सत्या..
सत्यानेदेखील वडील महेश मांजरेकरांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. पोरबाजार, जाणिवा, एफयू या चित्रपटांमधून सत्याने अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, सत्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...