आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trailer Release:अक्षय कुमारने केला \'चुंबक\'चा ट्रेलर रिलीज, लीड रोलमध्ये आहेत हे कलाकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलीवूडचा आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमारचे सादरीकरण असलेला चित्रपट म्हणून ज्याची प्रतीक्षा समस्त मराठी चित्रपटसृष्टीला लागली आहे, त्या ‘चुंबक’चा ट्रेलर स्वतः अक्षय कुमारने गुरुवारी 5 जुलै रोजी प्रकाशित केला. यावेळी प्रख्यात गीतकार, गायक आणि अभिनेता स्वानंद किरकिरे आणि चित्रपटातील इतर कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. त्यांत प्रमुख भूमिकेतील संग्राम देसाई आणि साहिल जाधव, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संदीप मोदी, लेखक सौरभ भावे यांचा समावेश होता. चित्रपटाचे निर्माते कायरा कुमार क्रिएशन्सचे नरेन कुमार तसेच केप ऑफ गुड फिल्म्सचे सदस्यही जुहू येथील पीव्हीआर सिनेमा येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

या ट्रेलरच्या शुभारंभप्रसंगी चित्रपटाबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, आयुष्यात कशाची निवड करायची याबद्दल या चित्रपटात भाष्य आहे. “आधी तुम्ही निवड घडवता आणि नंतर त्या निवडी तुम्हाला घडवतात,” तो म्हणाला. या चित्रपटाची प्रस्तुती करण्याची केलेली निवड ही अक्षयने अगदी हेतुपुरस्सर आणि चित्रपट पाहिल्यानंतर आलेल्या भावनेतून केलेली आहे.

 

प्रसन्नाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या स्वानंद किरकिरे यांनी सामाजिक माध्यमांवर बोलताना म्हटले आहे की, हा चित्रपट त्यांनी करण्याचे ठरवले त्याचे एकमेव कारण म्हणजे ही व्यक्तिरेखा. ही व्यक्तिरेखा साकारणे हे एक मोठे आव्हान तर होतेच पण आयुष्यातील ती एक महत्वाची भेटही होती. या व्यक्तिरेखेने आयुष्यातील काही महत्वाचे धडेही दिले आणि आयुष्य कायमस्वरूपी बदलूनही  टाकले, असेही ते म्हणाले.

 

दिग्दर्शक संदीप मोदी आणि निर्माते नरेन कुमार यांनी म्हटले आहे की, ‘चुंबक’ हा साध्या सरळ माणसांच्या आयुष्यातील घटनांवर आणि त्यांच्या आयुष्यातील द्विधा मनस्थितींवर आधारित एक वेगळा चित्रपट आहे. म्हणूनच ही कथा आपल्याला आपली वाटते. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, 'चुंबक'च्या ट्रेलर लाँचची छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...