आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मराठी फिल्मशी अक्षय कुमार चिकटला 'चुंबका'सारखा, जाणून घ्या काय आहे ही भानगड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडचा खिलाडी अर्थातच अभिनेता अक्षय कुमारचे नाव एका मराठी चित्रपटाशी जुळले आहे. ‘चुंबक’ हा आगामी चित्रपट बघून अक्षय कुमार प्रभावित झाला आणि त्याने या चित्रपटाची प्रस्तुती करण्याची जबाबदारी घेतली आहे.

 

सोशल मीडीयावरून ही बातमी ‘ब्रेक’ करण्यासाठी अक्षय कुमारने एक व्हीडीओ प्रसारित केला आहे. “काहीतरी अत्यंत प्रामाणिक आणि शुद्ध पाहण्याचा योग आला…ती गोष्ट माझ्या डोक्यात एखाद्या ‘चुंबका’सारखी पक्की बसली आहे. त्या चित्रपटाने भरपूर हसवले आणि रडवले. अनेक चित्रपट पाहिले, पण ही गोष्ट मनात बसून राहिली. आता पण गाडीत बसलो होतो, विचार करत होतो आणि म्हणून हा व्हिडिओ बनवला. म्हणून ठरवलं हा चित्रपट सादर करायचा. 27 जुलैला हा चित्रपट मी तुमच्यासाठी घेऊन येतोय आणि या चित्रपटाचे नाव आहे चुंबक... आशा करतो, की ही फिल्म तुम्हाला आवडेल," असे अक्षय म्हणाला आहे.

 

प्रख्यात लेखक, गायक, अभिनेता आणि दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे हे ‘चुंबक’मध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहेत. होतकरू कलाकार साहिल जाधव आणि संग्राम देसाई हेसुध्दा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमधून पदार्पण करत आहेत. चुंबकचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून चित्रपटाचे लेखन त्यांनी सौरभ भावे यांच्याबरोबर केले आहे. नरेन कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय कुमार प्रस्तुत मराठी चित्रपट ‘चुंबक’ संपूर्ण महाराष्ट्रात 27 जुलै 2018 रोजी प्रदर्शित होत आहे.


चुंबक या चित्रपटाच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरुनदेखील ही बातमी शेअर करण्यात आली आहे. "एक मस्त आणि आनंददायक बातमी तुम्हा सगळ्यांबरोबर share करायची आहे, आपल्या सगळ्यांचे लाडके बॉलीवूड सुपरस्टार Akshay Kumar यांनी #Chumbak सादर करायचं  ठरवलं आहे... फिल्म Chumbak 27 जुलै ला संपूर्ण महाराष्ट्रात release होणार आहे, तारीख लक्षात ठेवा. @swanandkirkire #ChumbakTheFilm" असे फेसबुक पेजवरुन पोस्ट करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...