आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठकबाईंनी बॉयफ्रेंड सुयशला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लिहीले, 'तुझ्याशिवाय मी काहीच नाही, लव्ह यु'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - मराठी अभिनेता सुयश टीळकने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. 10 जानेवारी रोजी सुयशच्या वाढदिवसानिमित्त सर्व मराठी कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या. पण या सर्वात लक्ष वेधून घेतले ते पाठकबाई अर्थात अक्षया देवधरच्या कमेंटने. अक्षया आणि सुयशचे नाते त्यांनी कधीही लवपले नाही. दोघेही एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात आणि त्यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे नेहमीच उघडपणे लिहीतातही. सुयशच्या वाढदिवसानिमित्त पाठकबाईंनीही एक फोटो शेअर करत लिहीले आहे की, तुझ्याशिवाय मी काहीच नाही..

 

अक्षयाने लिहीले आहे की, Happiest birthday to a person who has been there through it all ! I don’t know where I would be without you ! 🤗🤗🤗
You are the best! Have a great day ahead my boy ! 💕💕#
Love you forever ! ❤️❤️❤️

 

सोशल मीडियावर अक्षया आणि सुयश नेहमीच एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. यातील प्रत्येक फोटोला अससेल्या कॅप्शनवरुन हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे दिसते. सुयश टीळकच्या वाढदिवशी अक्षयाने दोघांचा एक फोटो शेअर करत त्याला 'लव्ह यु' हे कॅप्शन दिले होते. तर सुयशनेही अक्षयाच्या वाढदिवशी अक्षयासोबतचा फोटो शेअर करुन त्याला 'लव्ह यु फॉरेवर' असे कॅप्शन देत प्रेम जगजाहीर केले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अक्षया आणि सुयश यांचे सोबतचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...