आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणपणी आली होती कॉम्प्रमाईजची ऑफर, अलका कुबल यांनी उघड केले मराठी इंडस्ट्रीतील कटू सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबादमध्ये नुकतेच तेलुगु इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊच प्रकरण उघडकीस आले आहे.  साउथ चित्रपटांची अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काउचचे गंभीर आरोप लावले आहेत. तिने फिल्म चेंबर ऑफिसच्या बाहेर टॉपलेस होऊन आंदोलन केले. हा विषय चर्चेत असतानाच मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. अलका कुबल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनाही कास्टिंग काऊचचा अनुभव आल्याचे सांगितले. काय सांगितले अलका यांनी..

 

अलका कुबल यांनी मराठी इंडस्ट्रीतही कास्टिंग काऊचचा प्रकार घडत असल्याचे सांगितले आहे त्या म्हणाल्या, मला चित्रपटसृष्टीत येऊन आता 35 वर्ष झाली आहेत आणि मलाही माझ्या तरुणवयात एखाद्या चित्रपटात भूमिका मिळण्यासाठी 'मॅडम तुम्ही कॉम्प्रमाईज कराल का?' असे विचारले गेल्याचे सांगितले आहे. 

 

अलका कुबल यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली होती आणि त्यांना तरुणपणा अशा चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. अलका यांनी त्या ऑफर धुडकावून लावल्याचे सांगितले. जर आपल्या चांगल्या पद्धतीने काम करायला येत असेल तर कोणीही आपल्यावर जबरदस्ती करत नाही कारण यशामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो आणि जे लोक शॉर्टकटचा वापर करतात त्यांना फक्त वापरुन बाजुला केले जाते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पायलट आहे अलका कुबल यांची मुलगी ईशानी..

 

 

बातम्या आणखी आहेत...