आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Film: आता जॉनच्या ‘सत्यमेव जयते’मध्ये झळकणार अमृता, ट्रेलर लाँचला दिसला ग्लॅमरस लूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या नैसर्गिक अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या मराठमोळ्या अमृता खानविलकरला 2018 हे वर्ष खूपच यशदायी ठरत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘राझी’ या चित्रपटातील तिच्या उर्दू लहेजाचे सर्वत्र कौतुक झाले होते. समीक्षकांची आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवत हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये जाऊन पोहोचला आहे.  

 

‘राझी’ मधील शांत आणि सुस्वभावी अशी ‘मुनिरा’  साकारल्यानंतर अमृता आता मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात ती  सरिता हे मनोज वाजपेयीच्या पत्नीचे पात्र साकारत आहे. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट झाला. या इव्हेंटमध्ये चित्रपटातील संपूर्ण टीम हजर होती. यावेळी अमृताचा ग्लॅमरस लूक लक्षवेधी ठरला. 

 

वेब सीरिजच्या दुनियेत ठेवले आहे अमृताने पाऊल...

बॉलिवूड चित्रपटांसोबतच अमृता वेब सीरिजच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  ‘डॅमेज्ड’ या हिंदी वेब सिरीजमध्ये ती झळकली आहे. या वेबसीरिजने अल्पावधीतच  १० मिलीअन व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे. अंगावर शहारा आणणा-या सीरिअल किलर लोव्हीनाचे पात्र अमृताने या वेबसीरिजमध्ये साकारले आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, 'सत्यमेव जयते'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमधील अमृताची खास छायाचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...