आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राझी'नंतर अमृता खानविलकरच्या पारड्यात आणखी एक बॉलिवूड सिनेमा, मनोज वाजपेयीसोबत जमली जोडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर केवळ मराठीच नव्हे तर हिंदीतही तितकीच सक्रिय आहे. आलिया भट्टसोबत राजी चित्रपटात काम केल्यानंतर अमृताच्या हातात आता अजून एक मराठी सिनेमा आला आहे. अमृताची आता मनोज वाजपेयीसोबत जोडी जमली आहे. या चित्रपटाचे नाव जरी निश्चित झाले नसले तरी चित्रपटाचे शूटिंग मार्चच्या मध्यात सुरु होणार असल्याचे समजते. 

 

अमृताला याबद्दल विचारले असता तिने सांगितले, "मी मनोज वाजपेयी यांच्यासारख्या एका मोठ्या कलाकारासोबत काम करणार असल्याने फारच आनंदीत आहे. सुरुवातीला मी रिडींग सेशनदरम्यान फारच नर्व्हस होते पण मनोज सरांनी मला फार कम्फर्टेबल केले आणि त्यामुळे माझी भीती गेली."

 

अमृताचा आगामी सिनेमा 'राझी' हा येत्या 11 मार्चला रिलीज होणार आहे. यात आलिया भट्टसोबत तिने काम केले आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदीतही  कामाचे कौतुक होत असल्याचे अमृताने सांगितले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृता खआनविलकरचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...