आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - बिग बॉस घरात पहिल्या दिवसापासूनच वादविवादात असलेले अनिल थत्ते यांनी आता कॅप्टन विनीत भोंडेवर तोफ डागळली आहे. त्यांनी विनीतने त्यांच्या कपड्यांबद्दल असलेल्या कमेंटबद्दल नाराजी व्यक्त केली. विनीतने त्यांना ते बाथरुममध्ये असताना बनियान घाला असा सल्ला दिल्याने ते नाराज झाले आणि अशा कमेंटबद्दल कॅप्टनने माफी मागावी असे सांगितले आहे. याबद्दल मीटींगमध्ये बोलतांना म्हणाले की, जर विनीतने अशा प्रकारचा सल्ला अजून कोणाला द्यायचा प्रयत्न केला तर तो विनयभंग ठरेल, असे ते म्हणाले.
कुठून सुरु झाले प्रकरण..
बिग बॉसने दिलेल्या यज्ञाच्या टास्कदरम्यान अनिल थत्ते यांनी पूजा केली होती आणि त्यादरम्यान त्यांनी केलेल्या वेशभुषेमुळे त्यांच्यावर घरातील सर्वच सदस्यांनी आक्षेप घेतला तर उषा नाडकर्णी यांनी टिंगलटवाळीही केली होती. त्यानंतर आस्ताद काळेने त्यांना जाऊन नीट कपडे घालण्यास सांगितले होते आणि ते प्रकरणावर कितीतरी वेळ घरातील सदस्य चर्चा करत होते.
विनीतने साधला अनिल थत्ते यांच्यावर निशाना..
विनीतने त्यानंतर त्याची बाजू सांगताना म्हटला की अनिल थत्ते हे मुलींनी घरात घालण्याच्या कपड्यांवर आक्षेप घेतात आणि विनीतला त्यांनी घरातील सर्व मुलींना नीट कपडे घालण्याविषयी सांगितले होते. या मुद्द्यावरुन आता घरातील बरेच सदस्य अनिल थत्ते विरोधात झाले आहेत.
पुढच्या स्लाईडवर पाहा, अनिल थत्ते यांचे टास्कदरम्यानचे काही खास फोटोज्..
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.