आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सर्वांच्या पसंतीस उतरलेली टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे मणिकर्णिका या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरु आहे.
मराठी अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'मणिकर्णिका' या चित्रपटात काम करत आहेत. अंकिता लोखंडेने या चित्रपटात झलकारी बाई कोळीची भूमिका केली आहे तर वैभवचीही त्यात मुख्य भूमिका आहे. नुकतेच वैभवने त्याचे आणि अंकिता लोखंडेचे सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. त्याने फोटो शेअर करताना कॅप्शन दिले आहे की, On the sets of Manikarnika with this mad girl:-)
'मणिकर्णिका' या चित्रपटाचे शूटिंग सध्या बीकानेर येथे सुरु आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईवर आधारलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
पुढच्या स्लाईडवर पाहा, 'मणिकर्णिका' सेटवरील अंकिताचे काही खास Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.