आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकिता लोखंडे म्हणते, "कंगना नव्हे मीच आहे चित्रपटाची नायिका" !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या कंगना राणावतची भूमिका असलेल्या चित्रपटातून अंकिता झलकारी बाई कोळीची भूमिका करत आहे. चित्रपटाचे शूटिंग जयपूर येथे सुरु आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठी अभिनेता वैभव तत्ववादीचीही मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात कंगना हिरो असून मला हिरोईन म्हणून लाँच होण्याची संधी मिळत आहे असे अंकिताने म्हटले.

 

कंगना माझी गॉडफादर..
अंकिता लोखंडे कंगना राणावतची मोठी चाहती आहे. कंगनाचे तोंडभरुन कौतुक करताना अंकिता म्हणते की, "कंगना सेटवर असते तेव्हा तिच्यात केवळ झाशीची राणीच दिसते. पूर्णपणे केंद्रीत होऊन कंगना काम करत असते. कंगनाने या चित्रपटाद्वारे मला मोठी संधी दिली आहे. ती चित्रपटाचा नायक असून मी नायिका आहे आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे" असेही तिने सांगितले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अंकिता लोखंडेचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...