आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 53व्या वर्षीही इतक्या देखण्या आहेत अर्चना जोगळेकर, शूटिंगदरम्यान बलात्काराचा झाला होता प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा केला. 1 मार्च 1965 रोजी मुंबईत जन्मलेल्या अर्चना जोगळेकर यांनी केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी-ओडिया चित्रपट आणि मालिकांतही काम केले आहे. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयकौशल्याने अर्चना यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. लहानपणापासूनच अतिशय चाणाक्ष असलेल्या अर्चना यांनी कथ्थक नृत्यकलेचे धडे त्यांची आई आणि गुरु आशा जोगळेकर यांच्याकडून घेतले. केवळ अभिनय आणि नृत्यच नव्हे तर अर्चना उच्चशिक्षीतही आहेत आणि त्यांनी वकिलीची डबल डिग्री प्राप्त केली आहे. ओडीसा येथे शूटिंगदरम्यान बलात्काराचा झाला होता प्रयत्न..

 

अर्चना जोगळेकर या नव्वदीचे दशक त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने गाजविले. यादरम्यानच 1997 साली एका विकृत माणसाने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.  30 नोव्हेंबर 1997 साली अर्चना जेव्हा ओडिसा येथे एका चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. त्यावेळी त्या पंथा निवास येथे राहत होत्या. तेव्हा रात्री तिथे भुबानानंदा पंडा हा इसम गेला आणि अर्चना यांचा ऑटोग्राफ घेण्याच्या बहाण्याने त्यांच्या खोलीत शिरुन त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. डिसेंबर 1997 रोजी त्या माणसाला पकडण्यात आले होते आणि एप्रिल 2010 साली त्याला 18 महिने कारावासाची शिक्षा भुवनेश्वर फास्ट ट्रॅक कोर्टाने सुनावली. 

 

लग्नानंतर विदेशात स्थायिक आहेत अर्चना जोगळेकर..
अर्चना या सध्या लग्नानंतर विदेशात स्थायिक झाल्या आहेत. पण त्यांचे नृत्यप्रेमाने त्यांना तिथेही स्वस्थ बसू दिले नाही. अर्चना यांनी विदेशात म्हणजेच न्यू जर्सी येथे अर्चना नृत्यालय उघडले आहे आणि तिथे अनेक विद्यार्थ्यांना त्या कथ्थक नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देतात. अर्चना यांना सुर श्रृंगार समसाद यांच्याकडून 'श्रृंगार मनी' आणि हिंदी साहित्य परिषद यांच्याकडून 'नृत्य भारती' हा पुरस्कारही मिळाला आहे. 

 

या चित्रपटात केले आहे काम...
अर्चना जोगळेकर यांनी आतापर्यंत रंगत संगत, एका पेक्षा एक, अनपेक्षित, निवडुंग यांसारख्या मराठी चित्रपटात तर मर्दानगी, बात है प्यार की, आग से खेलेंगे, स्त्री यांसारख्या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. यासोबतच त्यांनी बोगामुल या तामिळ चित्रपटात तर सुना चंदेई या ओडिशा चित्रपटात काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...