आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रेगे' फेम अॅक्टरचे Pre Wedding फोटोशूट पाहिलंय का तुम्ही!! बॉलिवूड फिल्म्सच्या सेटवर केले फोटोशूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रेगे' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या आणि अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झालेला अभिनेता आरोह वेलणकर 11 डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अंकिता शिंगवी हे आरोहच्या पत्नीचे नाव आहे. महाबळेश्वरमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. अद्याप आरोह आणि अंकिताच्या लग्नाचे फोटोज समोर आलेले नाहीत. पण काही दिवसांपूर्वी दोघांनी एक खास प्री वेडिंग फोटोशूट करुन घेतले.

 

या फोटोशूटचा अल्बम स्वतः आरोहने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. अतिशय रोमँटिक असे हे फोटोशूट असून त्यातील प्रत्येक फोटो लक्ष वेधून घेतोय. या फोटोशूटचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे शूट ख्यातनाम दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या स्टुडिओत करण्यात आले आहे. या फोटोशूटसाठी स्टुडिओ दिल्यामुळे नितीन देसाईंचे आभार देखील आरोहने मानले आहे. जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो आणि इंदू सरकार या चित्रपटांच्या सेटवर आरोह आणि अंकिता यांचे हे फोटोशूट झाले आहे. 

 

आरोहने फोटोशूटचा अल्बम शेअर करुन त्यासोबत लिहिले, " Here’s the complete album. This shoot will be the most special for many years to come. Big thanks to Nitin Desai for giving us his studio and some iconic sets like jodha akbar, prem ratan dhan payo and indu sarkar." प्रथमेश रंगोले यांनी आरोह-अंकिताचे रोमँटिक क्षण आपल्या कॅमे-यात बंदिस्त केले आहेत.  


कशी झाली आरोहची अंकितासोबत भेट.. 
आरोह आणि अंकिता यांचे हे लव्ह मॅरेज आहे. पुण्यात असताना दोघे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. कॉलेजमध्ये असताना दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांत पुढे प्रेमात झाले.  


पाहुयात, आरोह-अंकिताच्या प्री-वेडिंग फोटोशूटची ही खास झलक... 

बातम्या आणखी आहेत...