आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा पार पडला 'असेही एकदा व्हावे' चित्रपटाचा Trailer लाँच, पाहा फोटोज्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उमेश कामत-तेजश्री प्रधान यांचा मराठी सिनेमा 'असेही एकदा व्हावे'चा ट्रेलर लाँच दिमाखात पार पडला. यावेळी उमेश-तेजश्रीसह चित्रपटाची संपूर्ण टीम येथे उपस्थित होती. 

 

'असेही एकदा व्हावे' या चित्रपटाद्वारे उमेश कामत आणि तेजश्री प्रधान ही जोडी प्रथमच आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटात तेजश्रीने एका आरजेची तर उमेश कामतने बिझनेसमनची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच समोर आले आहे आणि त्यात या दोघांचे एकमेकांवरील प्रेम, ताटातूट आणि गुंतागुंतीची कथा सांगण्यात आली आहे.

 

दिग्दर्शक सुश्रृत भागवत यांचा 'असेही एकदा व्हावे' हा चित्रपट येत्या 6 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात उमेश कामत, तेजश्री प्रधान, शर्वरी पिल्ले, चिराग पाटील, अजित भुरे, कविता लाड मेहेकर यांच्याही भूमिका आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'असेही एकदा व्हावे' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा सोहळा...

बातम्या आणखी आहेत...