आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊ कदम यांचा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, लेखक-दिग्दर्शकात आला 'क्रेडीट' वाद, नवीन पोस्टर केले रिलीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध हिंदी साहित्यकार उदय प्रकाश यांच्या विरोधानंतर मराठी चित्रपट दिग्दर्शक अमोल वसंत गोळे यांच्या नशीबवान चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. उदय प्रकाश यांच्या दिल्ली की दीवार या कादंबरीवरुन प्रेरीत असल्याचे सांगितले होते, काही साहित्यकारांनी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलच्या डायरेक्टर यांना पत्र लिहून अमोल गोळे यांच्याबद्दल तक्रारही केली होती. 16 जानेवारी रोजी या चित्रपटाचे स्क्रिनींगही होणार आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार अमोल गोळे यांनी उदय प्रकाश यांच्या कादंबरीवरुन वेब सीरीज बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांना उदय यांना माहिती न देता चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आणि लेखक म्हणून स्वतःचे नाव दिले. उदय यांना अमोल गोळे यांनी 50,000 रुपये देण्याचे मान्य केले होते. पण ते पैसेही उदय यांना मिळाले नाही. या सर्व घटनेबाबत अमोल यांना विचारले गेले असता त्यांनी लेखक म्हणून उदय यांना क्रेडीट न देण्याचा प्रश्नच येत नाही असे सांगितले. एक महिना अगोदर जेव्हा हा चित्रपट सेन्सरकडे पाठवण्यात आला तेव्हा लेखक म्हणून त्यांचेच नाव देण्यात आले होते असे सांगितले. अमोल यांनी उदय आणि त्यांच्या प्रशंसकांना जो त्रास झाला त्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. तसेच उदय यांचे 50,000 रुपये लवकरच चुकवू असेही आश्वासन दिले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमोल गोळे यांच्या नशीबवान चित्रपटाचे पोस्टर..

बातम्या आणखी आहेत...