आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: पत्नीला प्रपोज केल्यानंतर तिची अट ऐकून पळून गेला होता अवधुत गुप्ते, अशी आहे Lovestory

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गायक-अभिनेता अवधुत गुप्ते आज त्याचा 40वा वाढदिवस साजरा करत आहे. 19 फेब्रुवारी 1977 रोजी जन्मलेला अवधुत मुळचा कोल्हापुरचा आहे. केवळ गायकच नव्हे तर लेखक, गायक, दिग्दर्शक, निर्माता, होस्ट, अभिनेता यांसारख्या एक ना अनेक क्षेत्रात अवधुतने त्याचे नाव गाजवले आहे. मराठीतील एक सर्वगुणसंपन्न कलाकार अशी अवधुतची ओळख आहे. अवधुत किती उत्तम कलाकार आहे हे आपल्याला माहीत आहेच पण त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची प्रेमकथा आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
 अवधुत गुप्तेने त्याची लहानपणीची मैत्रीण गिरीजासोबत लग्न केले आहे. गिरीजा आणि अवधुत एकाच कॉलनीत राहत होते आणि अवधुत शाळेत असल्यापासूनच मुलींमध्ये अतिशय प्रसिद्ध होता. गिरीजाला हे सर्व ठाऊक होते. एक दिवस अवधुतने गिरीजाला प्रपोज करण्याचे ठरविले आणि तसे केलेही. पण गिरीजाने त्याला 'नुसते प्रपोज करुन चालणार नाही तर माझ्याशी लग्न करावे लागेल' असे अवधुतला ठणकावून सांगितले. यावर अवधुत 'मी विचार करुन येतो' असे सांगत तिथून पळून गेला आणि नंतर काही दिवस विचार केल्यानंतर त्याने गिरीजाला लग्नाचे वचन दिले. दोघांनी काही वर्षे डेट केल्यानंतर विवाह केला आणि आज त्यांचा सुखी संसार सुरु आहे. अवधुत अशा क्षेत्रात आहे जिथे कुटुंबाला फार कमी वेळ देता येतो त्यामुळे लग्नानंतर गिरीजाने कुटुंबाला पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेतला. त्यांना आता एक मुलगाही आहे.
 
 अवधुतने त्याच्या करिअरची सुरुवात 2002 साली कम्पोजर म्हणून केली होती. यावेळी त्याने पाऊस या अल्बममधील 8 गाण्यांसाठी कम्पोजरचे काम केले. यासाठी त्याला अल्फा गौरव पुरस्कारही मिळाला. यानंतर त्याचा ऐका दाजिबा हा अल्बम इतका लोकप्रिय झाला की आजही त्याचे गाणे मराठीच नव्हे तर अमराठी रसिकांच्याही लक्षात आहे. यानंतर मेरी मधुबाला हा अल्बम मराठि रसिकांच्या आवडीचा बनला. 
 
 अवधुतने होस्टींग क्षेत्रातही चांगलेच नाव कमावले. सारेगामापा लिटील चॅम्पसमध्ये जज बनलेला अवधुतचा खुपते तिथे गुपतेमधील होस्टही प्रेक्षकांना फार आवडला. अवधुतने झेंडा, मोरया, जय महाराष्ट्र धाबा भटींडा, यांसारख्या मराठीतील दर्जेदार सिनेमांची निर्मितीही केली. सध्या अवधुत सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाद्वारे जज म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, अवधुतचे फॅमिलीसोबतचे काही खास Photos....
बातम्या आणखी आहेत...