आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Song: \'लव्ह लफडे\' चित्रपटाचे \'तु परी\' गाणं रिलीज, अवधूत गुप्तेंच्या आवाजातील भावनिक गाणं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रेमाच्या विरहातील गाणी सध्या तरुणाईमध्ये खूपच गाजतात. त्यात आता एक नवं गाणं तरुणाईच्या भेटीला आले आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेचे 'लव्ह लफडे' सिनेमातील 'तु परी' हे गाणं नुकतचं रिलीज झालं आहे. संगीत दिग्दर्शक अनय नाईक, नृत्य दिग्दर्शक नितीन जाधव, तर गाण्याचे शब्द सचिन आंबत, संजय मोरे, अजय थोर्वे या तरुणांनी रचले आहेत. “धुंद स्वप्नातला, धुंद चेहरा तुझा, धुंद झाली नजर, जीव वेडावला, माझ्या मनातली तुच परी” या गीताला तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्तेचा आवाज भावनिक करुन जातो. अवधूत गुप्तेच्या सुंदर आवाजामुळे ती परी आपल्यासमोर आपसूक उभी राहते.

 

लव्ह-लफडे चित्रपटामध्ये लव्हगुरुच्या भूमिकेतील अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे यांच्यावर चित्रीत केलेले हे गाणं तरुणाईच्या मनात जागा निर्माण करत आहे. या गाण्याचे चित्रिकरण कोकणामधील दाभोळ समुद्र किनाऱ्यावर केलेले आहे. प्रेमभंग झालेल्या तरुणाला प्रेयसीची आठवण येते. तो तिला हृदयाच्या आर्ततेने साद घालतो. तिच्याशिवाय त्याला काहीच दिसत नाही. ती त्याच्या स्वप्नातली परी आहे. तिच्यासाठी नायकाचा जीव वेडावला आहे. असे या गीताचे बोल आहेत. हे गीत ऐकत असताना प्रत्येक प्रेम केलेल्या हृदयाला हळूवार साद घातली जाते. हेच या गीताचे बलस्थान आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.    

‘लव्ह लफडे’ तरुणाईने सजलेल्या या चित्रपटाला संगीत देखील तरुणाईला साजेसंच आहे. अनय नाईक यांनी तरुणांना मंत्रमुग्ध करेल असे संगीत दिले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन आंबात यांनी केले आहे. तर कथा-पटकथा संजय मोरे यांचे आहे. सलग मोशन पिक्चर्सच्या गीता कुलकर्णी आणि सॅक्रेड बुद्धा क्रिएशनचे सुमेध गायकवाड यांची संयुक्त निर्मिती आहे.

हा चित्रपट २० जुलै २०१८ रोजी एचसीसी नेटवर्क या मोबाईल ऍपवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये रोहित फाळके, रुचिरा जाधव, सुमेध गायकवाड, मोनिका दबडे, अवधूत वाडकर या चित्रपटात झळकणार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...