आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसच्या घरात असा असेल आजचा दिवस, सदस्यांना मिळणार सरप्राईझ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर पोलीस आणि कॅप्टनसीच्या कार्यासाठी स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगल्याचे प्रेक्षकांनी बघितलं. परंतु हे कार्य करत असताना बऱ्याच सदस्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. सदस्यांनी त्या भावना आठवड्याच्या भागामध्ये तसेच WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकर यांच्यासमोर देखील मनमोकळे पणाने व्यक्त केल्या. स्मिता गोंदकर हिने सईच्या शूजच्या लेस कापण, आणि त्यानंतर सईने तिच्या शुजच्या लेस लपवणे असो वा कॅप्टनसीच्या टास्क दरम्यान सई आणि जुई मध्ये झालेली बाचाबाची असो. सगळ्यांनीच आपली मते महेश मांजरेकर यांच्यासमोर मांडली. ऋतुजा, सई, जुई आणि पुष्कर यांनी त्यांच्या मनात असलेली नाराजगी व्यक्त केली. आज सदस्यांना एक सरप्राईझ मिळणार आहे आणि ते म्हणजे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणार आहेत महाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर. हे घरात गेल्यावर सदस्यांची काय प्रतिक्रिया असेल ? काय धम्माल मस्ती होणार आहे हे आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळाणार आये. तसेच दर आठवड्या मध्ये टास्क होणार ... नवा कॅप्टन देखील निवडला जाणार ... आणि घरामधून कोणीतरी बाहेर देखील जाणार ... आज घरामधून कोण बाहेर जाणार ? हे बघणे उत्सुकतेचे असेल. 


आज बिग बॉसच्या घरामध्ये जाणार आहेत महाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर. दोघांचेही घरामध्ये उत्तमरीत्या स्वागत होणार आहे. घरातील सदस्य देखील या दोघांना बघून खूप खुश झाले असणार यात शंका नाही. सचिन पिळगावकर घरच्यांना एक संदेश देखील देणार आहेत. घरातील सदस्यांना एक टास्क देखील देण्यात येणार आहे. त्यामध्ये कोण बाजी अमरेल ? कोणाच्या मनात काय आहे हे देखील कळणार आहे 

कोण एलीमनेट होणार ? कोणाला मिळणार विशेष अधिकार ? आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...