आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMarathi: बिग बॉस मराठीच्या घरामधून रेशम टिपणीसची एक्झिट, मेघाने धरले रेशमचे पाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता सदस्यांनी प्रत्येक टास्क, नॉमिनेशन खूपच सिरीयसली घ्यायला सुरुवात केली आहे. स्पर्धकांसाठी हा शेवटचा आठवडा असल्याने खूप कठीण असणार आहे हे नक्कीच. पुष्करला या आठवड्यामध्ये टिकीट टू फिनाले मिळाल्यामुळे तो बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामधील महाअंतिम फेरीमध्ये पोहचलेला पहिला स्पर्धक ठरला आहे. या आठवड्यामध्ये आस्ताद, स्मिता आणि रेशम मधून कोण घराबाहेर पडेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सगळ्याच स्पर्धकांमध्ये आता अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी चुरस रंगलेली दिसत आहे. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर जाणे अनिवार्य होते. या आठवड्यामध्ये बॉस मराठीच्या घरामधून रेशम टिपणीसला घराबाहेर जावे लागले आहे. 

 

रेशमचा बिग बॉसच्या घरातील 90 दिवसांचा प्रवास... 
रेशम बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणारी पहिली स्पर्धक होती. ती या घरामध्ये ९० दिवस राहिली. तिच्या या घरामधील प्रवासामध्ये बरीच वळण आली, बऱ्याच घटना घडल्या, आव्हानं तिच्यासमोर आली पण तिने सगळ्या परिस्थितींवर मात केली. पहिल्या दिवसापासून रेशम टिपणीस चर्चेमध्ये राहिली. मग कुठल्या टास्कमुळे असो वा सई आणि मेघा मध्ये असलेल्या भांडणामुळे. रेशम, आस्ताद, सुशांत, भूषण, स्मिता यांच्यामधील मैत्री नेहेमीच चर्चेमध्ये राहिली. परंतु या आठवड्यामध्ये तिला बाहेर जावे लागले. 


रेशमने आस्तादला केले सेफ... 
रेशम टिपणीस या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडली. रेशम टिपणीसला बिग बॉस यांनी एक खास अधिकार दिला ज्यानुसार कोणत्याही एका सदस्याला ती नॉमिनेशन पासून वाचवू शकते आणि रेशम हिने आस्ताद काळेला सुरक्षित केले  आणि म्हणूनच आस्ताद बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या अंतिमफेरीमध्ये पोहचणारा दुसरा स्पर्धक ठरला.

 

मेघाने धरले रेशमचे पाय.. 
बिग बॉसच्या घरात विकेण्डच्या डावामध्ये मेघा धाडे हिने रेशम टिपणीसचे चक्क पाय धरून तिची माफी मागितली. हे दृश्य पाहून घरातील सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्काच बसला.  'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक असलेल्या मेघा व रेशम या दोघींमधून आजवर विस्तवही जात नव्हता. परंतु रेशमविषयी मनात असलेली अढी विसरून मेघाने तिची माफी मागितली. आजवर मेघा ही रेशमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप वाईटसाईट बोलली. रेशमवर टीका करण्याची एकही संधी तिनं सोडली नव्हती. परंतु, या सगळ्याचा मेघाला पश्चात्ताप झालाय. तसे तिने बोलूनही दाखवले. 'रेशमने कसे वागावे हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. त्याविषयी बोलण्याचा काहीही अधिकार नाही,' असंही ती म्हणाली. या शोमध्ये मी सर्वात जास्त वाईट कुणाशी वागले असेन तर ती रेशम आहे,' अशी कबुलीच तिने दिली. मेघाने रेशमचे पाय धरल्यावर रेशमही सर्वकाही विसरून गेली. 


आणखी एक स्पर्धक होणार घराबाहेर... 
GRAND FINALE ला फक्त पाच स्पर्धक असणार आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये अजून एक नॉमिनेशन होणार असे महेश मांजरेकर यांनी घोषित केले. या घरामध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोणता टास्क मिळेल ? काय घडणार ? हे बघणे रंजक असणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...