आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BBMday16 : बिग बॉसच्या घरात \'सैराट\' झाले पुष्कर-सई, \'पिंगा\'वर थिरकल्या रेशम-स्मिता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सई-पुष्कर, रेशम-स्मिता आणि आस्ताद-प्रसेनजीत कोसंबी - Divya Marathi
सई-पुष्कर, रेशम-स्मिता आणि आस्ताद-प्रसेनजीत कोसंबी

एन्टटेन्मेंड डेस्क : बिग बॉसच्या 16 व्या दिवशी घरात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. सर्व स्पर्धकांनी घरात महाराष्ट्र दिन साजरा केला. या खास दिनाचे औचित्य साधत अभिनेता प्रियदर्शन जाधव, आगामी चित्रपट 'सायकल' च्या प्रमोशनच्या निमित्ताने बिग बॉसच्या घरी आला होता. चित्रपटाच्या प्रमोशनसोबतच प्रियदर्शनने स्पर्धकांसोबत धमाल केली. यावेळी सर्व स्पर्धक मराठमोळ्या अवतारात दिसले. प्रत्येक स्पर्धकाने यावेळी विविध सादरीकरण केले. पुष्कर आणि सई यांनी सैराटच्या गाण्यावर ताल धरला. सई आणि पुष्करच्या जोडीबद्दल प्रचंड चर्चा रंगत असताना घरच्यांनी तर या दोघांच्या जोडीला घेऊन सैराट चित्रपटाचा दुसरा भाग बनवा अशी इच्छाही हसत-हसत व्यक्त केली. तर रेशम आणि स्मिता पिंगा या गाण्यावर थिरकल्या. काही स्पर्धकांनी गाणी म्हणत आपल्या सुरेल आवाजाची झलक दाखवली. यावेळी मेधा धाडे 'हात नका लावू माझ्या साडीला' या गाण्यावर थिरकली. 

 

मराठमोळ्या अंदाजात दिसले सर्व स्पर्धक
घरातील काही बायकांनी म्हणजेच रेशम, मेघा, स्मिता, जुई, नववारी नेसल्या होत्या. पुरुषांनी फेटा, झब्बा असा पोशाख परिधान केला होता. या सर्व स्पर्धकांनी मोठ्या उल्हासात – जल्लोषात हा दिन साजरा केला. या स्पर्धकांबरोबर बिग बॉसच्या घराबाहेर गेलेले विनित भोंडे आणि आरती सोळंकीनी यांनी महाराष्ट्र दिनी बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती. ब-याच दिवसांनंतर घरात आल्याने आरती सोळंकी खुप खुश दिसली.

 

प्रियदर्शनसोबत प्रसेनजीत कोसंबीची खास हजेरी
प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम 'सूर नवा ध्यास नवा' मधील प्रेसेनजीत कोसंबी घरामध्ये आले. प्रेसेनजीत त्याच्या खड्या आणि गगनभेदी आवाजामुळे प्रेक्षकांचा लाडका बनला. बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये देखील महाराष्ट्र दिनानिमित्त त्याने 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणे म्हटले. त्याच्या या उत्तम गाण्यानंतर आस्ताद काळे यानेही त्याच्यासोबत जयस्तुते हे गाणे म्हटले. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की, आस्ताद काळे हा एक उत्तम गायक आहे, आणि तो बऱ्याचदा बिग बॉसच्या घरामध्ये गाणे गाताना दिसतो. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बिग बॉसच्या घरातील 16 व्या दिवसाचे खास फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...