आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBDay18 : या कारणांमुळे बिग बॉसनं दिली सदस्यांना शिक्षा, मेधा-रेशममध्ये राडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : बिग बॉसच्या घरात काल चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात सर्वच सदस्य टास्क पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतू टास्क योग्य प्रकारे पुर्ण न केल्याने बिग बॉसने काल सर्वांना शिक्षा दिली. बिग बॉसने घरातील सदस्यांना 'चोर पोलिस' हे टास्क दिले होते. या टास्कमध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्य टास्क पुर्ण करण्यात अपयशी ठरले. 'चोर' गटाला 'पोलीस' गटातील सदस्यांच्या जास्तीत जास्त वस्तूंची चोरी करायची होती. पण या दोन्ही गटांनी संगनमताने कोणते साहित्य चोरी करायचे हे ठरवले. यामुळे त्यांचा टास्क फसला. बिग बॉसने यामुळे घरातील सर्व सदस्यांना शिक्षा सुनावली.

 

लाल चौकटी उभे राहण्याची दिली शिक्षा
बिग बॉस म्हणाले की, काय चोरी करायचे हे सांगणारे पहिलेच पोलिस आम्ही पाहिले. यामुळे सर्वांना शिक्षा सुनावण्यात आली. सर्वांना गार्डन एरियामध्ये आखलेल्या लाल चौकटीत उभे राहण्यास सांगण्यात आले. बिग बॉसच्या घराची सर्वत दारे बंद करण्यात आले आणि त्यांना त्या चौकटी बाहेर जाण्यास नकार मनाई करण्यात आली. यानंतर घराचा ताबा मिळवण्यासाठी सदस्यांना काही अटी घालण्यात आल्या. असे करत एक-एक करत सदस्यांनी संपुर्ण घरावर पुन्हा ताबा मिळवला.  सदस्य यशस्वी झाल्यामुळे बिग बॉसने पुन्हा एकदा 'चोर पोलिस' हा टास्क सुरु केला. 

 

मेधा आणि स्मितामध्ये भांडण
याच काळात मेधा आणि स्मिता यांच्यामध्ये जोरदार भांडण पाहायला मिळाली. टास्कमध्ये अपयशी झाल्याचे सर्व खापर स्मिताने मेधाच्या डोक्यावर फोडले. यामुळे मेधा तिच्यावर तिडलेली दिसली. दोघींचे कडाक्याचे भांडण पाहायला मिळाले. 

 

कोणती टीम जिंकणार हे पाहणं महत्त्वाच
शिक्षा भोगल्यानंतर बिग बॉसनं पुन्हा एकदा 'चोर पोलिस' चा टास्क सुरु केला. यावेळी राजेशची टीम चोर, तर सईची टीम पोलिस बनून घेळणार आहे. हा खेळ सुरु होताच प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. स्मिताने यावेळी चांगलाच गोंधळ घातला. मेधाही आरडा ओरडा करताना दिसली. आता यामध्ये कोण जिंकणार हे उद्याच्या भागात पाहायला मिळेल.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या एपिसोडचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...