आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज्या-शितलीच्या प्रेमातला खलनायक आहे भैयासाहेब, पडद्मामागे को-स्टार्ससोबत करतो धमाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटटेनमेंट डेस्क - मागील वर्षी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या 'लागिरं झालं जी' मालिकेने अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आज्या, विक्या, राहुल्या, शितली ही नावं ऐकली तरी कान टवकारायला होतात. आता या पात्रांमध्ये आणखी एका पात्राची भर पडली आहे आणि ते पात्र आहे भैयासाहेबांचे. ही भूमिका अभिनेता किरण गायकवाड साकारतोय. सध्या हे पात्र अजिंक्य आणि शीतल यांच्या प्रेमातील व्हिलन ठरत आहे. 


अलीकडच्या एपिसोडमध्ये अजिंक्यने शीतलला लग्नाची मागणी घातली आहे. तर दुसरीकडे भैयासाहेबांचे शीतलवर एकतर्फी प्रेम आहे. जेव्हा त्याला शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळते, तेव्हा त्याचा राग अनावर होतो. हर्षवर्धन अजिंक्यला मारण्यासाठी गुंड पाठवतो. भारतीय सेनेत भरती झालेला आपला अजिंक्य या सगळ्या परिस्थितीला कसा सामोरे जाणार हे मालिकेच्या येणा-या भागांमध्ये बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


मालिकेत भैय्यासाहेब हे पात्र खलनायक आहे. पण पडद्मामागे मात्र भैय्यासाहेब, शीतल आणि अजिंक्य धमाल करताना दिसतात. 'लागिरं झालं जी' मालिकेचे काही पडद्मामागील क्षण आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवलत आहोत. भैय्यासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड आणि इतर कलाकार फावल्या वेळेत करत असलेली धमाल-मस्ती तुम्हाला येथे बघता येणार आहे. 


मालिकेतील कलाकारांचे बिहाइंड द सीन्स बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...