आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मराठीतील चतुरस्त्र अभिनेत्री मुक्ता बर्वे लवकरच आगामी चित्रपट 'आम्ही दोघी' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मुक्ताने अमला नावाच्या एका ग्रामीण स्त्रीची भूमिका साकारली आहे. यात मुक्ता बर्वेसोबत अभिनेत्री प्रिया बापटही झळकणार आहे. अगदी दोन टोकाच्या भिन्न व्यक्ती आणि त्यांचे खास नाते या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील भूमिका आणि चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त तिच्याविषयी काही खास गोष्टी आपण घेऊन आलो आहोत. मराठी इंडस्ट्रीतील परफेक्शनीस्ट अशी आहे ओळख...
साधारण रंगरुपाची मुक्ता बर्वे किती उत्तम अभिनेत्री आहे हे चित्रपटरसिकांना वेगळे सांगायची गरज नाही. अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्यानंतर मुक्ताची एक वेगळी ओळख आणि ठसा सिनेसृष्टीत निर्माण झाला आहे. आजच्या घडीला असा एकही रोल नाही जो मुक्ता करु शकणार नाही असा तिच्या चाहत्यांना विश्वास आहे. फक्त फॅन्सच नाही तर कलाकारही तिच्या अभिनयकौशल्याचे कौतुक करताना थकत नाही. याचमुळे मुक्ताला बॉलिवूडमधील आमिर खानप्रमाणे परफेक्शनिस्ट असा टॅग मिळाला आहे.
गंभीर चेहऱ्याची मुक्ता आहे प्रचंड खोडकर..
मुक्तासोबत सध्या आम्ही दोघीमध्ये काम करताना प्रिया बापटने काही खास गोष्टी सांगितल्या, ती म्हटली की, मुक्ताच्या गंभीर चेहऱ्यावर जाऊ नका. प्रत्यक्ष आयुष्यात ती फारच मस्तीखोर आहे आणि ती आली की सेटवर एक लेगळाच माहोल तयार होते. मुक्ता मला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे सेटवर वाटते आणि ति्चयासोबत प्रथमच काम करण्याचा अनुभव केवळ सुंदरच नव्हे तर अविस्मरणीय होता.
वयाच्या पस्तीशीत अजूनही अविवाहीत आहे मुक्ता..
मुक्ताने एका मुलाखतीदरम्यान असा खुलासा केला होता की तिला तिच्या मनाप्रमाणे जोडीदार अजून मिळाला नाही. जेव्हा तो मिळेल त्या दिवशी मी नक्कीच लग्न करेल असे तिने सांगितले.
पुढच्या स्लाईडवर पाहा, मुक्ता बर्वेचे आम्ही दोघी चित्रपटाचे On Location फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.