आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेच्या ट्रीपदरम्यान भाग्यश्रीला पतीने केले होते प्रपोज, कुटूुंबियांच्या विरोधामुळे पळून केले होते लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क -  'मैने प्यार किया' या चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल 28 वर्षांचा काळ लोटला आहे. इतके वर्ष होऊनही हा चित्रपट अजूनही तितकाच हवाहवासा वाटतो त्याचे कारण आहे आपले चित्रपटातील प्रेम आणि सुमनशी जुळलेले नाते. हीच सुमन म्हणजेच अभिनेत्री भाग्यश्री आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त तिची खास प्रेमकथा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत..

 

सलमान खानने रंगवलेला प्रेम आणि सुमनचा भाबडा अंदाज प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. चित्रपटात या दोघांच्या नात्याला होणारा विरोध आणि त्यातून त्यांनी काढलेला मार्ग अशी चित्रपटाची कथा आहे. या कथेशी थोडी मिळतीजुळती कथा आहे या चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्रीची रिअल लाईफ प्रेमकथा. शाळेत असताना प्रेमात पडली होती भाग्यश्री..

 

ट्रीपदरम्यान फुलली दोघांची प्रेमकथा...
भाग्यश्री आणि पती हिमालय दसानी एकाच शाळेत शिकण्यासाठी होते. एकदा शाळेची ट्रीप हैदराबादला गेली असताना भाग्यश्री आणि हिमालय यांनी विविध स्थळांना भेट दिली. या ट्रीपदरम्यान दोघांनी बराच वेळ सोबत घातला आणि ट्रीप संपता संपता हिमालयने भाग्यश्रीला प्रपोज केले. भाग्यश्रीनेही तात्काळ होकार भरला. पण घरच्यांना भागश्रीचे हे नाते पसंत नव्हते. त्यांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली नाही.

 

पळून जाऊन केले लग्न..
हिमालय दसानी यांचे नाव आज प्रसिद्ध बिझनेसमनमध्ये येते. अॅक्टींग करिअर फ्लॉप झाल्यानंतर त्यांनी बिझनेसकडे लक्ष देत मोठा व्यवसाय उभा केला. हिमालय-भाग्यश्रीचे लग्न झाले तेव्हा भाग्यश्री 19 वर्षांची होती. आईवडिलांना लग्न करण्यासाठी भाग्यश्रीचे वय फार कमी वाटत होते त्यामुळे त्यांनी या लग्नात भाग न घेण्याचा निर्णय घेतला. भाग्यश्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या आईवडिलांना असे वाटत होते की, जर ते लग्नात आले नाही तर भाग्यश्री लग्न करणार नाही पण तसे झाले नाही. भाग्यश्रीने हिमालयसोबत लग्न केले. लग्नानंतर मुलगा अभिमन्युच्या जन्मापर्यंत भाग्यश्रीचे आईवडील तिच्याशी बोलले नव्हते.

 

लग्नाच्या दोन दिवस अगोदर झाले होते मेहंदीच्या सीनचे शूटिंग..
'मैने प्यार किया' या चित्रपटातील मेहंदीचा सीन तुम्हाला आठवत असेल. विशेष म्हणजे भाग्यश्रीच्या खऱ्याखुऱ्या लग्नाच्या केवळ दोन दिवस अगोदर हा सीन शूट झाला होता. भाग्यश्री आणि हिमालय यांच्या लग्नामध्ये सलमान खान आणि सूरज बडजात्या हे दोघेच तिच्याकडून उपस्थित होते.

 

पतीच्या पझेसिव स्वभावामुळे सोडले बॉलिवूड...
भाग्यश्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, पती हिमालय दसानी तिच्यासाठी फारच पझेसिव असे. त्यातून होणारा ताणतणाव तिला नको असल्याने तिने बॉलिवूडमध्ये चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. केवळ कुटुंबाकडे आणि मुलांकडे लक्ष द्यावे अशी सासरच्या मंडळींची अपेक्षा असल्याने भाग्यश्रीने घर सांभाळण्याचा निर्णय घेतला. आज भाग्यश्री-हिमालय यांना दोन मुले आहेत. मुलगा अभिमन्यू आणि मुलगी अवंतिका. अभिमन्यू हा चित्रपटात येण्याच्या तयारीत आहे तर अवंतिका लंडन येथे बिझनेसचे शिक्षण घेत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, भाग्यश्रीचे तिच्या कुटुंबासहीतचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...