आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर बर्थ डे साजरा करतो हा स्टारकिड, लवकरच करणार बॉलिवूड एंट्री!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू आज त्याचा 28वा वाढदिवस साजरा करत आहे. भाग्यश्रीने अभिमन्यूला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहीले आहे, To the twinkle of my eye and beat of my heart....HAPPY BIRTHDAY ABHIMANYU.Be kind, be humble, be loved always.❤
Be everything you want to be and more....God bless you my son.

 

विशेष म्हणजे उद्या म्हणजे मुलाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी भाग्यश्री तिचा वाढदिवसही साजरा करणार आहे. भाग्यश्रीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने एअरपोर्टवरील एक फोटो शेअर केला आहे त्यावरुन भाग्यश्री तिचा वाढदिवस परदेशात साजरा करणार आहे असे समजते. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आहेत. 


अभिमन्यू अभिनय आणि डान्सचे सध्या प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या डॅशिंग लुकमुळे तो परफेक्ट हिरो मटेरिअल आहे असे म्हणावयास हरकत नाही.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, भाग्यश्री आणि तिच्या मुलाचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...