आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊ कदम यांनी \'चला हवा येऊ द्या फेम\' विनीत भोंडेला लग्नाच्या दिल्या शुभेच्छा, शेअर केला Photo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चला हवा येऊ द्या' फेम विनीत भोंडे नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. आपल्या कॉमिक टायमिंगने सर्व प्रेक्षकांना हसवणारा विनीत भोंडेला त्याच्या आयुष्याची सहचारीणी लाभल्याबद्दल अभिनेता भाऊ कदम यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ कदम यांनी इन्सटाग्रामवर विनीतच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिले आहे,  Congratulations 🎊 you both Mr. And Mrs. Vineet Bonde. My Heartly Wishes that you both have a wonderful happy married life ahead. ♥
 
 
धामधुमीत पार पडले विनीत भोंडेचे लग्न...
विनीतचे लग्न औरंगाबाद येथे धामधुमीत पार पडले. खरेतर त्यासा साध्या पद्धतीने लग्न करण्याची इच्छा होती पण नातेवाईक, मित्र यांच्या आग्रहास्तव विनीतने धामधुमीत लग्न करण्याचा निर्णय घेतला. विनीतची पत्नी सोनम नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे तिची परिक्षा असल्याने विनीतने त्याचा हनीमून लांबणीवर टाकला आहे. मात्र परिक्षा संपल्यावर ते दोघे अंदमान निकोबारला हनीमूनसाठी जाणार आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, विनीतच्या लग्नाचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...