आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शनाया'ला गवसला दुसरा 'गॅरी', श्वेता मेहेंदळेसह केली तिघांनी पार्टी, काय आहे नेमके प्रकरण?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम शनाया म्हणजेच रसिका सुनीलला दुसरा गॅरी मिळाला आहे आणि तो गॅरी दुसरा-तिसरा कोणी नसून मालिकेच्या कन्नड व्हर्जनचा गुरुमुर्ती अर्थात भवानी सिंग आहे. खुद्द भवानीने रसिका आणि मालिकेतील रेवती म्हणजेच शेवेता मेहेंदळे आणि रसिकासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. यात हे तिघेही एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले दिसत आहेत आणि पान शॉटचा आनंद घेत आहेत. 

 

गुरुमुर्ती अर्थात भवानी सिंग 'माझ्या नवऱ्याची बायको'चे कन्नड व्हर्जन 'सुब्बुलक्ष्मी सम्सारा' या मालिकेत गॅरीची भूमिका करत आहे. काही दिवसांअगोदरच भवानीने मालिकेच्या सेटवर सर्वांना भेट दिली होती. भवानी सिंगने त्यावेळी दिलेल्या भेटीचा फोटो आता throwback म्हणत शेअर केला आहे. यावेळी त्याने रसिका आणि श्वेताचा उल्लेख मराठी इंडस्ट्रीतील Heartskippers असा केला आहे. मराठी मालिकेप्रमाणेच कन्नड मालिका 'सुब्बुलक्ष्मी सम्सारा' या मालिकेलाही प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, भवानी सिंगने 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेच्या सेटवर भेट दिली त्यावेळचे Photos...

बातम्या आणखी आहेत...