आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामधील पहिला कॅप्टन होण्याचा मान विनीत भोंडेला मिळाला. तो कॅप्टन झाल्यापासून त्याच्या वागणुकीमध्ये झालेला बदल घरातील रहिवाशी संघाला प्रकर्षाने जाणवू लागला आहे. विनीतच्या बोलण्याच्या पद्धती एक प्रकारची गुर्मी आल्याचे आणि तो उर्मटपणे बोलत असल्याचे तसेच काही रहिवाश्यांना हा त्याचा बालिशपणा वाटत आहे. विनीतचे प्रत्येक वेळेला बिग बॉसकडे जाऊन छोट्या – छोट्या गोष्टींची मागणी करणे, कॅप्टन असल्याने घरातील ईतर सदस्यांना कामे सांगणे, सारखी टीम मीटिंग आयोजित करणे, मुद्दा सांगण्यात स्पष्टता नसणे अशा प्रकारच्या अडचणी बिग बॉसच्या घरातील रहिवाशी सहन करत आहेत.
बिग बॉस मराठीच्या घराचा पहिला कॅप्टन झाल्यानंतर विनीतच्या बोलण्यामध्ये आलेला फरक घरातील सदस्यांना खटकत आहे. विनीत भोंडेला वारंवार आस्ताद काळे आणि राजेश शृंगारपुरे यांनी त्याच्या वागणुकीमध्ये लवकरात लवकर बदल करावा हे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. अनिल थत्ते यांनी विनीत भोंडेचा संपूर्ण टीम समोर पाणउतारा केला. अनिल थत्ते आपले मनोगत व्यक्त करत असताना विनीतने त्यांना दोनदा थांबवले ज्याचा त्यांना खूप राग आला. तसेच अचानक कॅप्टन झाल्यामुळे विनीतच्या डोक्यात हवा गेली आहे, त्याला वरीष्ठांशी कसे बोलावे हे देखील कळत नाही असे घरच्यांचे म्हणणे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.