आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#BBMarathi:मुळची औरंगाबादची आहे बिग बॉस फेम ऋतुजा धर्माधिकारी, अभिनयासाठी सोडले शिक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - बिग बॉस मराठी घरात 15 कलाकारांपैकी एक कलाकार ऋतुजा धर्माधिकारीचा समावेश आहे. मराठी चित्रपटरसिकांना फारसे ओळखीचे नसलेले नाव असल्याने ऋतुजाला सध्या बिग बॉसमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यानंतर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलाय की, ऋतुजा नेमकी आहे तरी कोण. बिग बॉसमध्ये आल्यानंतर एका सेशनदरम्यान ऋतुजाने तिच्या आयुष्याबद्दलच्या काही खास गोष्टी बिग बॉस सदस्यांसोबत शेअर केल्या. अभिनयासाठी सोडले घर...

 

ऋतुजा धर्माधिकारी ही मुळची औरंगाबादची आहे. ऋतुजाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इतकेच नव्हे तर अभ्यासातही ऋतुजा पुढे होती. ऋतुजाने तिच्या गोष्टी शेअर करताना सांगितले की, लहानपणापासून अभ्यासाची आवड होती तरीही बारावीमध्ये आल्यानंतर ऋतुजाचे अभ्यासातून लक्ष उडाले आणि केवळ अभियनाचा तिला ध्यास लागला. यावरुन घरामध्ये खूप गदारोळ निर्माण झाला आणि अखेर खूप प्रयत्न केल्यानंतर ऋतुजाला अभिनयात करिअर करण्यासाठी परवानगी मिळाली. 

 

औरंगाबादवरुन पुण्यात झाली शिफ्ट..
अभिनय करायचा असल्याने ऋतुजाने पुण्यात एम.ए इन ड्रामाला अॅडमिशन घेतले आणि त्यानंतर ऑडिशनसाठी पुणे-मुंबई असा तिचा प्रवास सुरु झाला. घरातून नाराजी असल्याने ऋतुजाने घरच्यांची कधीच मदत मागितली नाही. सततचे ऑडिशन, धावपळ असे करत ऋतुजाला रात्रीस खेळ चाले ही मालिका मिळाली आणि आता कुठे हळू हळू तिची इंडस्ट्रीत ओळख व्हावयास सुरुवात झाली आहे. 

 

बोलताना भावनिक झाली होती ऋतुजा धर्माधिकारी..
बिग बॉसने दिलेल्या आदेशानंतर घरातील सर्वचजण आपापल्या आयुष्यातील संघर्ष, उतारचढाव एकमेकांसोबत शेअर करत होते. मानातला हळवा कोपरा सर्वासमोर उघड करताना सर्चजण भावनिक होत होते. ऋतुजाही यावेळी सांगताना भावनिक झाली होती.  अभ्यास सोडून अभिनयाकडे वळण्याचा तिचा निर्णय आणि त्यानंतर झालेली तगमग सांगताना रडू कोसळले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, ऋतुजा धर्माधिकारीचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...