आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Big Boss Marathi Rajesh Shrungarpure First Reaction After Elimination #BBMarathi: शोमधून बाहेर पडल्यानंतर राजेश भेटला पत्नीला, रेशमविषयी म्हणाला हे...

#BBMarathi: शोमधून बाहेर पडल्यानंतर राजेश भेटला पत्नीला, रेशमविषयी म्हणाला हे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. या आठवड्यामध्ये जुई गडकरी, राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस हे डेंजर झोनमध्ये आले होेते आणि  या तिघांपैकी राजेशला घराबाहेर जावे लागले. राजेश घराबाहेर पडल्याचे दु:ख सर्वाधिक रेशम टिपनीसला झाले. राजेश घराबाहेर जात असताना तिला अश्रू अनावर झाले होते. आता घराबाहेर पडलेल्या राजेशने मीडियाशी संवाद साधला. 

मीडियाशी बोलताना आपण काहीही चुकीचं वागलो नसल्याचे राजेशने म्हटले आहे. 


पत्नी डिंपलची मिळाली ही रिअॅक्शन... 
घराबाहेर पडल्यानंतर पत्नीची काय प्रतिक्रिया होती, असा प्रश्न राजेशला विचारला गेला असता, तो म्हणाला, मी बाहेर आल्याचा पत्नीला फार आनंद झाला.घरातून बाहेर आल्यानंतर राजेशने पत्नीला मिठी मारत आनंद व्यक्त केला, असे राजेशने सांगितले. 


रेशम कायम राहणार जीवाभावाची मैत्रीण... 
रेशम टिपणीससोबतच्या नात्याविषयी सांगत राजेश म्हणाला, ‘रेशमसोबतचे माझे आयुष्य हे कायचम असून, ती माझी खूपच चांगली मैत्रीण असणार आहे. बिग बॉसच्या निमित्ताने मला एक जिवाभावाची मैत्रीण भेटली. तिला माझी साथ कायम राहील."


रेशमसोबतच्या नको तितक्या जवळीकीमुळे घराबाहेर पडला राजेश... 
राजेश आणि रेशम यांच्यातील नको तेवढी वाढलेली जवळीक प्रेक्षकांना रुचली नाही. सोशल मीडियावर या दोघांवर टीकेची झोडच उठलेली दिसली. टास्क किंवा खेळामुळे नव्हे तर रेशमसोबतच्या नको तेवढ्या जवळीकीमुळे तू या स्पर्धेतून बाद झाला, असे महेश मांजरेकरांनी राजेशला सांगितले. 

 

दोन मुलींचा वडील आहे राजेश...

राजेशच्या पत्नीचे नाव डिंपल श्रृंगारपुरे असून त्यांच्या लग्नाला 11 ते12 वर्षांचा काळ लोटला आहे. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. मुलींवर खूप प्रेम असल्याचे, राजेश अनेकदा शोमध्ये बोलताना दिसला. तसंच पत्नी डिंपल अतिशय समजूतदार असल्याचेही त्याने शोमध्ये म्हटले होते. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, राजेशचे फॅमिली फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...