आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अनसिन अनदेखाच्या वुटवरील नव्या क्लिपमध्ये स्मिता गोंदकर आणि अनिल थत्ते त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंटबद्दल बोलताना दिसत आहेत. यावेळी स्मिता तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे बोलताना दिसली. तिला कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि यानंतर कामाच्या ठिकाणी तिने घेतलेल्या लीडर्स ट्रेनिंगनंतर तिच्यात व्यक्ती म्हणून कसा बदल झाला, हे तिने यावेळी सांगितले.
स्मिताच्या मते, ती समर्थ आहे आणि स्वतंत्र आहे. तिच्या आयुष्यात तिचे पाय खेचणारे अनेक लोक होते आणि तो तिच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट काळ होता, हेही ती यावेळी मान्य केले.
एका घटनेनंतर तर तिने तिच्या वडिलांना फोन केला आणि धाय मोकलून रडल्याचं ती सांगते. तिच्या वडिलांनी तिला परत बोलावलं होतं, परंतु आधीच आपल्या आई-बाबांनी शिक्षण आणि इतर गोष्टींवर इतका खर्च केलाय, तर परत कसं जायचं, म्हणून परत न गेल्याचं आणि अर्थात पुन्हा एकदा कामात झोकून दिल्याचंही ती सांगते. तिच्या कामाच्या ठिकाणी तर, विविध संस्कृतींमध्ये वाढलेली ती एकमेव मराठी मुलगी होती. परंतु तिने अखेर करून दाखवलंच आणि तिने 'बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द मंथ' आणि 'बेस्ट वाइन कीपर' अशी टायटल्स मिळवली. तिच्या ऑफिसमध्ये झालेल्या लीडर्स ट्रेनिंग सेशनला ती उपस्थित होती. यामुळे एक शांत व्यक्ती म्हणून विकसित होण्यास मदत झाली. यामुळे ऑफिसमधील कुठल्याही गोष्टीने विचलित न होता ती काम करायला शिकली, असेही स्मिताने सांगितले.
याकाळात मला ही देवाण-घेवाणीची युक्ती सापडली, यामुळे अनेक संधी खुल्या झाल्या, ज्याबाबत मी पूर्वी अपरिचितच होती, असेही स्मिता म्हणाली.
पुढील स्लाईड्सवर बघा, बिग बॉसच्या घरातील स्मिताची निवडक छायाचित्रे..
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.