आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाकट्या बहिणीसोबत आहे शर्मिष्ठाची खास बॉन्डिंग, सुप्रिया असा करतेय बहिणीला सपोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळवलेली शर्मिष्ठा सध्या चर्चेत आहे. ती बिग बॉसमध्ये प्रामाणिकपणे खेळताना दिसतेय. अशातच तिची धाकटी बहीण सुप्रिया राऊतचाही तिला घराबाहेरुन सपोर्ट मिळतोय. सुप्रियाचा थोरल्या बहिणीला खुप मोठा सपोर्ट आहे. यावर सुप्रियाने इंस्टाग्रामवर पोस्टही टाकली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, ताई मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तू हा शो चांगल्याप्रकारे खेळ, हार मानू नकोस. 

 

बहिणींची आहे खास बॉन्डिंग 
सुप्रिया आणि शर्मिष्ठा यांची खास बॉन्डिंग आहे. सुप्रिया शर्मिष्ठाला सोशल मीडियावरुन वेळोवेळी सपोर्ट करताना दिसते. काही दिवसांपुर्वी सुप्रिया शर्मिष्ठाला भेटायला बिग बॉसच्या घरातही आली होती. तेव्हा दोघींची चांगली बॉन्डिंग सर्वांना पाहायला मिळाली होती. सुप्रियाने आपल्या ताईला अनेक टिप्स दिल्या होत्या. तिने कसा खेळ खेळायला हवा आणि तिने स्क्रिनवर आपला प्रेसेन्स कसा दाखवावा अशा अनेक गोष्टी तिने आपल्या बहिणीला सांगितल्या होत्या. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शर्मिष्ठा आणि सुप्रियाची खास बॉन्डिंग दाखवणारे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...