आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay67: नंदकिशोरची हुकूमशाही राजवट मोडीत, असा पुकारला बंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात बिग बॉसने सोपवलेले "द ग्रेट डिक्टेटर" हे कार्य सुरु होते. यामध्ये नंदकिशोर नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा होती. नंदकिशोर कार्यामध्ये प्रजेला बरेच टास्क आणि शिक्षा देत होता. स्मिता आणि आस्ताद हुकुमशहा नंद किशोर यांचे रक्षक होते. टास्क दरम्यान नंदकिशोर यांनी प्रजेकडून अनेक कामं करुन घेतली. त्यांच्यावर हुकूमत गाजवली. परंतू आता घरातील सदस्यांनी या हुकूमशाही विरोधात बंड पुकारला आहे.

 

प्रजा ठरली यशस्वी
हुकूमशाही मोडित काढण्यासाठी बिग बॉसनेही प्रजेला काही टास्क दिले. यामध्ये त्यांना हुकूमशहाच्या पोस्टरला काळे फासणे. हुकुमशहाचा पुतळा पाडणे. हुकूमशहाच्या स्पेशल खोलीत जाऊन बॉम्ब फोडणे. त्याच्या अंगावर पाणी ओतणे असे टास्क देण्यात आले. यावेळी प्रजा आणि हुकूमशहाचे रक्षक यांच्यामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मेघाला शिक्षाही झाली. हुकूमशहाने शर्मिष्ठालाही शिक्षा दिली. नंतर मेघा, सई आणि पुष्करने मिळून हुकुमशहाच्या खोलीत जाऊन बॉम्ब ब्लास्ट केले. हुकूमशहाचा पुतळा पाण्यात टाकण्यात आला. अशा प्रकारे या टास्कमध्ये प्रजाही हुकुमशाही राजवट मोडीत काढण्यास यशस्वी ठरली.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...