आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Astad Kale Will Quit The Show In Next 24 Hours आस्तादच्या गर्लफ्रेंडचे ठरले लग्न! 24 तासांत शो सोडून जाऊ शकतो आस्ताद

#BBMarathi: आस्तादच्या गर्लफ्रेंडचे ठरले लग्न! 24 तासांत शो सोडून जाऊ शकतो आस्ताद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोमवारच्या भागात घरात ग्रामपंचायतीचा टास्क रंगला. त्यातूनच सदस्यांची नॉमिनेशन प्रक्रिया झाली. सुशांत शेलार, उषा नाडकर्णी, सई लोकूर कालच्या भागात नॉमिनेट झाले. आता आजच्या भागात रेशम आणि मेघा यांच्यापैकी कोण नॉमिनेट होणार यावरुन पडदा उचलला जाणार आहे. पण यासोबतच घरात आज नवीन टास्कही रंगणार आहे.  आजवर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडलेल्या टास्कमध्ये सदस्यांनी शक्ती आणि युक्तीचा चलाखीने वापर करायचा असा आदेश होता. असू सांगूनही घरामध्ये युक्तीपेक्षा शक्तीचाचं वापर जास्त झाला. परंतु आता वेळ आली आहे, खऱ्या अर्थाने सदस्यांच्या युक्तीची शक्ती तपासण्याची. बिग बॉस सदस्यांवर आजच्या आठवड्यातील साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत. या कार्याचे नावं आहे “मर्डर मिस्ट्री”.

 

बिग बॉस मराठीच्या या रहिवाशी संघामध्ये काही खून होणार आहेत, परंतु हे खून शारीरिक नसून सांकेतिक असतील. या कार्यामध्ये कोणीतरी एक खुनी असेल तर कोणी एक गुप्तहेर असेल आणि काही सामान्य नागरिक. या प्रकारचा अनोखा टास्क पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार आहे. 

 

आस्तादने हर्षदा-जुईला दिला मोठा धक्का... 
हे होतं असतानाच आस्तादने हर्षदा, जुई, मेघा यांना एक चिठ्ठी घरातून आल्याचे सांगितले तसेच फोन आल्याचे देखील सांगितले. ज्यामध्ये त्याच्या जवळच्या व्यक्तीचे म्हणजेच त्याची गर्लफ्रेंड स्वप्नालीचे लग्न ठरणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या शोमध्ये आस्तादने त्याची प्रेयसी स्वप्नालीचे नाव जगजाहिर केल्याने ती त्याच्यावर वैतागली असल्याचेही आस्तादने यावेळी हर्षदा, जुई आणि मेघाला सांगितले. जर खासगी आयुष्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली, तर शो अर्ध्यावर सोडून जाण्याची मुभा असल्याचेही आस्तादने सांगितले. त्यामुळे या परिस्थितीत त्याला वाटल्यास तो घर सोडून जाऊ शकतो आणि त्याला चोवीस तासांचा अवधी देखील देण्यात आला आहे असे आस्ताद आजच्या भागात हर्षदा, जुई यांना सांगणार आहे. त्यामुळे खरंच आस्तादच्या गर्लफ्रेंडचे लग्न ठरले का? की हा फक्त टास्कचा एक भाग आहे? यात कुठलं गुपित दडलेले आहे ? हे आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना कळणारच आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, आजच्या भागाची निवडक क्षणचित्रे...

बातम्या आणखी आहेत...