आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: 35 वर्षांचा झाला आस्ताद काळे, कॅन्सरने कायमची हिरावून घेतली गर्लफ्रेंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आस्ताद काळे, दिवंगत अभिनेत्री प्राची मते - Divya Marathi
आस्ताद काळे, दिवंगत अभिनेत्री प्राची मते


एंटरटेनमेंट डेस्कः छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी छाप उमटवणारा आणि आता बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून आपल्या भेटीला येत असलेल्या अभिनेता आस्ताद काळेचा  आज वाढदिवस आहे. 16 मे 1983 रोजी पुण्यात जन्मलेल्या आस्तादने वयाची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. वयाच्या 35 व्या वर्षी आस्ताद सिंगल आहे. विशेष म्हणजे पुर्वी तो रिलेशनशिपमध्ये होता. पण कॅन्सरमुळे 2013 मध्ये त्याच्या गर्लफ्रेंडचे निधन झाले. प्राची मते हे तिचे नाव होते.

 

अभिनेत्री होती प्राची...

प्राची स्वतः एक अभिनेत्री होती. चार दिवस सासूचे, अग्निहोत्र या मालिकांमध्ये प्राचीने अभिनय केला होता. पण वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी बोनमॅरो कॅन्सरने प्राचीची प्राणज्योत मालवली होती. प्राचीला बोनमॅरो कॅन्सर होता आणि तिचा आजार अंतिम टप्प्यात असल्याचे निदान झाले होते.  मुळची पुण्याची असणारी प्राची मराठी सिनेसृष्टीत नुकतीच स्थिरावली होती.  


बिग बॉसच्या थत्तेगिरी कार्यक्रमात निघाला होता प्राचीचा उल्लेख...
काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात आस्तादच्या तोंडून प्राचीचा उल्लेख निघाला होता. अनिल थत्तेंनी त्यांच्या थत्तेगिरी या कार्यक्रमात आस्तादला बोलते केले होते. प्राचीच्या शेवटच्या काळात तिच्यासोबतच असल्याचे आस्तादने सांगितले होते. या अतिशय कठीण काळात नाना पाटेकरांनी मनोबल वाढवल्याचे आस्तादने सांगितले होते. यावेळी आस्तादच्या मनात प्राचीच्या आठवणी दाटून आल्या होत्या.   


पुढील स्लाईड्सवर वाचा, आस्तादविषयी बरंच काही आणि सोबतच बघा त्याची बालपणीपासून ते आतापर्यंतचे निवडक Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...