आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: लग्नाआधीच मुलीचा जन्म, दोन ब्रेकअप, मेघा धाडेचे वादग्रस्त आहे खासगी आयुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती आदित्य आणि मुलगी साक्षीसोबत मेघा. - Divya Marathi
पती आदित्य आणि मुलगी साक्षीसोबत मेघा.

एंटरटेन्मेंट डेस्कः बिग बॉस मराठी या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मेघा धाडे हिचा आज वाढदिवस आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मेघाचा जन्म  22 मे 1988 चा आहे.  

 

मुळची जळगावची आहे मेघा... 

मेघा मुळची जळगावची आहे. तिचे शिक्षणही तिथेच झाले. मेघाने इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता. पण तिने शिक्षण अर्धवट सोडले आणि अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबई गाठली. कसौटी जिंदगी की, किस देश में है मेरा दिल, कस्तुरी या हिंदी मालिकांमध्ये काम केल्यानंतर मेघा मराठी चित्रपटसृष्टीकडे वळली. 

 

कमी वयातच आई झाली होती मेघा..

मेघा लग्नापूर्वीच आई झाल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे. तिच्या मुलीचे नाव साक्षी आहे. बिग बॉसच्या घरात मेघा अनेकदा साक्षीचा उल्लेख करताना दिसत असते. मेघा 15-16 वर्षांची असताना तिचे जळगावस्थित एका तरुणासोबत प्रेम जुळले होते. त्यातूनच तिला दिवस गेले. पाच महिने उलटून गेल्यानंतर मेघाला ती प्रेग्नेंट असल्याचे समजले होते, असे ती वूटवरील बिग बॉस मराठीच्या अनदेखा फुटेजमध्ये हर्षदा खानविलकरला सांगितले. आईवडील, भाऊ, समाजाच्या विरोधात जाऊन मुलीला जन्म दिल्याचे मेघाने सांगितले. 

 

'त्या' व्यक्तीशी नव्हे पण कुटुंबाशी आजही संपर्कात आहे मेघा... 

वूटच्या अनदेखा फुटेजमध्ये मेघाने हर्षदा खानविलकरला सांगितले, की ती आता त्या व्यक्तीच्या संपर्कात नाही. पण त्याच्या कुटुंबाशी आजही तिचे चांगले संबंध आहेत. इतकेच नाही तर तिची मुलगी साक्षी त्याच्या कुटुंबीयांना भेटायला नेहमी जात असते. आजही त्या व्यक्तीने लग्न केले नसल्याचे मेघाने सांगितले. ती व्यक्ती मेघासोबत लग्न करायला तयार होती, पण मेघाने त्याच्यासोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. 

 

तीन वर्षे एका अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती मेघा...

वूटच्या अनदेखा फुटेजमध्ये मेघाने तीन वर्षे एका अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली. पण त्या अभिनेत्याचे नावाचा उल्लेख यावेळी टाळला गेला. विशेष म्हणजे हा अभिनेता हर्षदा खानविलकर यांच्याही परिचयाचा आहे. मेघाने सांगितल्यानुसार, ज्या व्यक्तीसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती, त्याच्यासोबत तिची मुलगी साक्षीचे स्ट्राँग बाँडिंग तयार झाले होते. पण त्याच्या अतिपझेसिव्हनेसला ती कंटाळली होती. त्यातून सतत त्यांचे खटके उडायचे आणि म्हणूनच तिने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. पण ब्रेकअप करताना साक्षीला कसं सांभाळणार हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. कारण तिचे मित्रमैत्रिणीदेखील याच्यापेक्षा चांगला वडील तुझ्या मुलीला भेटू शकणार नाही, असे सांगून तिची समजूत घालत होते. पण अखेर मेघाने अतिपझेसिव्हनेसमुळे त्या व्यक्तीसोबत कायमचे संबंध तोडले. 

 

तीन वर्षांपूर्वी घटस्फोटित व्यक्तीसोबत लग्न...

दोन ब्रेकअपनंतर अखेर मेघाला तिच्या आयुष्याचा जोडीदार गवसला. तीन वर्षांपूर्वीच मेघाने आदित्य पावस्कर नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले. मेघाने बिग बॉसच्या घरात तिच्या पतीचा उल्लेख करताना सांगितले होते,  'लहान वयात माझ्या हातून काही चुका घडल्या होत्या. लग्नाच्या आधीच मी आई झाल्यानंतर माझं आयुष्य खूपच खडतर होत गेलं. या सर्व घटनेमुळं घरच्यांनी देखील मला लांब केलं होतं. आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या, पण मी न खचता माझं करिअर घडवलं. मी कधी लग्न करेन असे मला वाटलही नव्हतं. पण काही वर्षांपूर्वी मी लग्न केलं. माझे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्हाईस प्रेसिडेण्ट आहेत. माझ्या पतीचे देखील हे दुसरे लग्न आहे. त्यांना 15 वर्षांचा एक मुलगा आहे.'

 

दहावीत गेली मेघाची लेक..

मेघाची मुलगी साक्षी यावर्षी दहाव्या वर्गात गेली. तर तिचे पती आदित्य यांच्या मुलाने  याचवर्षी दहावीची परीक्षा दिली आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, मेघाची निवडक छायाचित्रे..

बातम्या आणखी आहेत...