आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Contestant Sharmishta Raut Is Divorcee घटस्फोटित आहे BIGG BOSS मराठीची ही नवीन स्पर्धक, लव्ह मॅरेज ठरले अपयशी

घटस्फोटित आहे BIGG BOSS मराठीची ही नवीन स्पर्धक, लव्ह मॅरेज ठरले अपयशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उजवीकडे वर - हे छायाचित्र शर्मिष्ठाच्या धाकट्या बहिणीच्या लग्नातील असून लाल वर्तुळात शर्मिष्ठाचे पुर्वाश्रमीचे पती अमेय निपाणकर दिसत आहेत. - Divya Marathi
उजवीकडे वर - हे छायाचित्र शर्मिष्ठाच्या धाकट्या बहिणीच्या लग्नातील असून लाल वर्तुळात शर्मिष्ठाचे पुर्वाश्रमीचे पती अमेय निपाणकर दिसत आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरात गुरुवारी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. शर्मिष्ठाने मन उधाण वा-याचे, जुळून येती रेशीमगाठी, उंच माझा झोका या मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरुनही शर्मिष्ठा प्रेक्षकांच्या भेटीला आली     आहे. योद्धा, चि. व चि. सौ. कां या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.

 

स्वतःशीच करणार शर्मिष्ठा स्पर्धा...

शर्मिष्ठाने बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच आपली मतं मांडायला सुरुवात केली आहे. मेघा, सई आणि उषा नाडकर्णी घरात छान खेळत असल्याचे तिने त्यांना सांगितले आहे. सोबतच माझी स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशीच असल्याचेही तिने म्हटले आहे. ग्रॅण्ड फिनालेपर्यंतची तयारी करुन शर्मिष्ठा या घरात दाखल झाली आहे.

 

घटस्फोटित आहे शर्मिष्ठा...

बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी शर्मिष्ठाने तिच्या खासगी आयुष्यातील एका मोठ्या गोष्टीचा उलगडा केला. सई, आऊ आणि मेघाशी बोलताना शर्मिष्ठाने याचवर्षी जानेवारी महिन्यात तिचा घटस्फोट झाल्याचे उघड केले. 

 

शर्मिष्ठाचे होते लव्ह मॅरेज...

लग्नाच्या नऊ ते दहा वर्षांनी शर्मिष्ठाने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे. शर्मिष्ठाचे लग्न अमेय निपाणकर नावाच्या तरुणासोबत झाले होते. अमेयसोबत शर्मिष्ठाचे लव्ह मॅरेज होते. घरच्यांच्या परवानगीने दोघांनी लग्न केले होते. पण आयुष्यात काही निर्णय चुकतात, तसा लग्नाचा निर्णय चुकला. तसंच गेल्या काही महिन्यांत खूप मानसिक तणावातून गेल्याचे शर्मिष्ठाने यावेळी सांगितले. या कठीण परिस्थितीत आईवडिलांची भक्कम साथ मिळाल्याचेही तिने सई आणि मेघाला सांगितले. 

 

बिग बॉसच्या घरात येण्यामागचा हेतू...

बिग बॉसच्या घरात येण्यामागचा हेतूच या सर्व मानसिक ताणातून बाहेर येण्याचा आहे. बिग बॉसचे हे घर मला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढेल, असेही शर्मिष्ठा यावेळी म्हणाली.  

 

शर्मिष्ठाला आहे एक धाकटी बहीण...

भरत राऊत हे शर्मिष्ठाच्या वडिलांचे तर रंजना राऊत हे आईचे नाव आहे. शर्मिष्ठाला एक धाकटी बहीण असून सुप्रिया हे तिचे नाव आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघुयात, शर्मिष्ठाचे बालपणीचे आणि काही निवडक फॅमिली फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...