आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Day 30 & 31 Highlights टास्कदरम्यान सईला दुखापत, मेघाने म्हटले राजेश, रेशम, सुशांत यांना ढोंगी !

#BBMday 30 & 31 : टास्कदरम्यान सईला दुखापत, मेघाने राजेश, रेशमला म्हटले ढोंगी !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल “थेंबे थेंबे तळे साचे” हे साप्ताहिक कार्य सदस्यांना देण्यात आले. ज्यादरम्यान सदस्यांमध्ये बरीच भांडण बघायला मिळाली. सईला टास्क दरम्यान दुखापत देखील झाली. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जेंव्हा पाणी सोडण्यात येईल तेंव्हा दोन्ही टीम्सने त्यांच्या टीमला देण्यात आलेल्या टाकीमध्ये पाणी भरायचे होते आणि त्यासाठी टीम्सना बादल्या देण्यात आल्या होत्या. नळाला पाणी थोड्याच वेळासाठी सोडण्यात येणार असून टीमने त्या कालावधीतच जास्ती जास्त पाणी भरणे अपेक्षित होते. आज देखील हा टास्क घरामध्ये खेळला जाणार असून, बिग बॉस आज घरातील सदस्यांन अजून एक कार्य देणार आहेत. 


आज स्पर्धक खेळणार   “व्यक्त व्हा मुक्त व्हा” हा टास्क.. 
आज म्हणजेच बुधवारच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे “व्यक्त व्हा मुक्त व्हा” हे कार्य. घरातील सदस्यांच्या मनामध्ये एकमेकांविषयी प्रचंड राग खदखदतो आहे असे बिग बॉस यांच्या प्रकर्षाने निदर्शनास आले आहे. त्यामुळेच या कार्यानुसार बिग बॉस मराठीच्या घरामधील सदस्यांना बिग बॉस त्यांच्या मनातील राग व्यक्त करण्याची संधी देणार आहेत. गार्डन एरियामध्ये पंचिंग बॅग आणि बॉक्सिंग ग्लोव्हस तसेच सर्व सदस्यांचे फोटोज ठेवण्यात येणार आहेत. त्या पंचिंग बॅगवर सदस्यांचे फोटोज लावून आपल्या मनातील राग बाहेर काढायचा आहे आणि कटू भावनांना मोकळी वाट द्यायची आहे. परंतु हा राग फक्त त्या बॅगला मारून नव्हे तर मनात साठलेल्या भावना आणि राग बोलून देखील दाखवायचा आहे.

 

जुई काढणार सई-मेघा आणि ऋतुजावर राग... 
- या टास्क दरम्यान सर्व सदस्यांना तो राग व्यक्त करण्याची संधी बिग बॉस देणार आहेत. जुईला जेव्हा संधी मिळाणार आहे तेंव्हा ती सई, मेघा आणि ऋतुजावर आपला राग व्यक्त करणार आहे. 
- पुष्करने जुई, स्मिता, राजेश, रेशम, भूषण म्हणजेच त्यांच्या संपूर्ण ग्रुपवर राग व्यक्त करणार आहे. ज्यामध्ये त्याने या संपूर्ण ग्रुपमधील सदस्य स्वत:लाच बिग बॉस समजत आहेत असे सांगणार आहे. 
- त्यानंतर मेघा देखील याच ग्रुपवर तिची नाराजी व्यक्त करताना दिसणार आहे. ज्यामध्ये ती रेशम आणि राजेश आवडत नाही असे म्हणार असून यामधील कोणामध्येच मोठेपण नाही, सगळे ढोंगी आहेत आणि चांगलेपणाचे नाटक करतात असे म्हणणार आहे. 
- रेशम सई, जुई आणि उषाजी यांवर राग व्यक्त करणार असून सई आणि तिची स्पर्धाच नाही असे सांगणार आहे. तसेच मेघा आणि उषाजींवर देखील बरीच नाराजगी व्यक्त करणार आहे.
- ऋतुजा या टास्कमध्ये आपल्या मनामध्ये असणारा राग आणि बऱ्याच कटू भावना मोकळी करताना दिसणार आहे. ती जुईला नुसता गोड चेहरा आहे, असे म्हणताना दिसणार आहे, तर रेशम आणि भूषण बद्दल देखील राग व्यक्त करणार आहे.
-  राजेश, सुशांत, स्मिता, भूषण, उषाजीयांच्या मनामध्ये काय आहे हे आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना कळेलच.


पुढील स्लाईड्सवर बघा, कालच्या भागाची निवडक छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...