आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMarathi : आज स्पर्धकांना पाण्यासाठी करावी लागणार वणवण, रंगणार 'हा' टास्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारच्या भागात राजेश श्रृंगारपुरेची घरवापसी झाली. त्यानंतर नॉमिनेशन प्रक्रिया रंगली. यामध्ये जुई, रेशम, राजेश, सई आणि ऋतुजा नॉमिनेट झाले. आता आजच्या भागात कोणकोण नॉमिनेट होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यासोबतच बिग बॉस आज स्पर्धकांना एक नवीन टास्क देणार आहे. “थेंबे थेंबे तळे साचे” हे या टास्कचे नाव आहे. 

 

पाण्याचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी घरातील सगळ्या नळांचे पाणी बंद करण्यात येणार आहे. या कार्याअंतर्गत घरातील सदस्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात येणार आहे. या टीम्सना दोन रिकाम्या टाक्या देण्यात येणार आहेत. घरातील कुठल्याही कार्यास पाणी हवे असल्यास सदस्यांना या टाकीत पाणी भरायचे आहे, आणि दैनंदिन कार्यासाठी पाणी लागल्यास याच टाकीतील पाणी वापरणे अनिवार्य असणार आहे. जेव्हा पाणी सोडण्यात येईल तेव्हा टीमच्या टाकीत पाणी भरायचे आहे, आणि त्यासाठी टीम्सना बादल्या देण्यात येणार आहेत.

 

नळाला पाणी थोड्याच वेळासाठी सोडण्यात येणार असून टीमने त्या कालावधीतच जास्ती जास्त पाणी भरणे अपेक्षित आहे. तेव्हा या टास्क मध्ये कोणीती टीम बाजी मारणार ? हे बघणे

उत्सुकतेचे असणार आहे.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा,  “थेंबे थेंबे तळे साचे” या टास्कचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...